सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे होणार जंगी स्वागत

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती कणकवली-:सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जंगी स्वागत जिल्हा भाजपाच्या वतीने करण्यात येणार आहे. याबाबत भाजपा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत नियोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. राणे यांच्या मेडिकल कॉलेज च्या उदघाटनासाठी शहा सिंधुदुर्गात येत आहेत. अमित शहा यांच्या आगमनामुळे जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांमध्ये…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्थेचे प्रा. पी. व्हीं. जाधव यांचे निधन

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पी व्हीं जाधव यांचे गोवा येथील मणिपाल रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास निधन झाले. 26 जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.उपचारासाठी त्यांना कुडाळ येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अधिक उपचाराची आवश्यकता वाटल्याने त्यांना गोवा येथील मणिपाल रुग्णालयात…

Read More

१७ ते २० मार्च कालावधीत मालवण येथे निलेश राणे’ चषक स्पर्धा

*निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाबा परब मित्रमंडळ व मालवण स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजन *💫मालवण दि.२७-:* माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाबा परब मित्रमंडळ व मालवण स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने १७ मार्च ते २० मार्च या कालावधीत मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदानावर ‘निलेश राणे’ चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती बाबा…

Read More

शाळकरी सवंगड्यांनी केली कॅन्सरग्रस्त महिलेला मदत…

*💫कणकवली दि.२७-:* कणकवली शहरातील कॅन्सरग्रस्त शिल्पा गणेश गावडे या महिलेला तिच्या शाळकरी सवंगड्यांनी रोख ४० हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत केली. शिल्पा गावडे ही गांगो मंदिर परिसरात राहणारी महिला कॅन्सरग्रस्त असून धुणीभांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. नवऱ्याला वेडाचे झटके येतात तर १२ वर्षांची मुलगीही अबनॉर्मल आहे. शिल्पाचे कॅन्सरचे ऑपरेशन डेरवण येथील हॉस्पीटलमध्ये झाले. मात्र ऑपरेशननंतर…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार ८०० कोरोना बाधित रुग्ण बरे

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली माहिती* *💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५ हजार ८०० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आज ७ रुग्ण बरे हाेऊन घरी परतले आहेत., अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २१५ आहे. तर जिल्ह्याबाहेर उपचारासाठी गेलेल्या रुग्णांची संख्या…

Read More

*मालवण आडारी पूल ते आंगणेवाडी रस्त्याची खड्डयांनी चाळण

*महिन्याभरात डांबरीकरण पूर्ण न झाल्यास रास्ता रोकोचा ग्रामस्थांचा इशारा *💫मालवण दि.२७-:* मालवण ते बेळणे कणकवली मार्गावरील मालवण आडारी पूल ते आंगणेवाडी या रस्त्याची खड्डयांनी पूर्ण चाळण झाल्याने वाहतुकीस सदर मार्ग धोकादायक बनला आहे. सर्वात जास्त रहदारीचा मार्ग असूनही रस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याने आंगणेवाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शशी आंगणे यांनी नाराजी व्यक्त करीत महिन्या…

Read More

आरोस अपघातातील वायरमनचे निधन

महिनाभर सुरू होते उपचार *💫सावंतवाडी दि.२७-:* आरोस गिरोबावाडी येथून आरोस बाजारच्या दिशेने जाणारे वायरमन दीपक आत्माराम नाईक(45) यांच्या दुचाकीसमोर अचानक बिबटा आल्याने मोठा अपघात झाला होता. अपघात भीषण असल्याने गेले 25 दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना आज बुधवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. आरोस मधील दीपक नाईक यांना झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली…

Read More

कुली वासीयांच्या समस्या सोडविण्याचे लेखी द्या

आमदार नितेश राणे यांचा प्रशासनाला इशारा ; अन्यथा पुढील निर्णय ठरवू;अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्याशी साधला संपर्क *💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* नवीन कुली गावठाण वसाहतीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी, पुनर्वसित गावठाणातील 18 नागरी सुविधा देण्याबाबत प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे 18 ऐवजी 13 नागरी सुविधा दिल्या जातील असे सांगितले जात आहे .याबाबत आमदार नितेश राणे यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी…

Read More

मारहाण प्रकरणी कंत्राटी रेल्वे कर्मचाऱ्याची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता…

*💫सिंधूदुर्गनगरी दि.२७-:* रेल्वेच्या नियमित कर्मचाऱ्याला कंत्राटी कर्मचाऱ्यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा केल्याच्या आरोपातून परळी बीड येथील गोविंद बाळासाहेब मुंडे (२६) याची सिंधुदुर्गचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. संशयित आरोपी च्या वतीने वकील यतिश खानोलकर, सुहास साटम, सुमन गावडे यांनी काम…

Read More

मळगाव ब्रिज नजीक अवैध दारू वाहतूक करताना एकास ताब्यात…

*💫सावंतवाडी दि.२७-:* गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना मळगाव पुला नजीक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करत 6720 रुपयाची अवैद्य दारू व मोटरसायकल जप्त केली. यावेळी दारू वाहतूक करणाऱ्या गणेश गजानन काळसेकर रा.गोठण सावंतवाडी याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मळगाव ब्रिज जवळ करण्यात आली. ही कारवाई पोलीस हेडकॉन्स्टेबल सावंत, पोलीस नाईक,वालावलकर,…

Read More
You cannot copy content of this page