सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्थेचे प्रा. पी. व्हीं. जाधव यांचे निधन

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पी व्हीं जाधव यांचे गोवा येथील मणिपाल रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास निधन झाले. 26 जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.उपचारासाठी त्यांना कुडाळ येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अधिक उपचाराची आवश्यकता वाटल्याने त्यांना गोवा येथील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचे शरीर उपचाराला साथ देत नसल्याने 27 रोजी सायंकाळी 4.30 क्या सुमारास निधन झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील मसुरे माले या गावातील रहिवासी असलेले पी.व्ही. जाधव यांनी 2018 साली सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य पदाची धुरा हाती घेतली होती. मागील दोन वर्षाच्या काळात त्यांनी चांगली कामगिरी करत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राज्य तसेच देशपातळीपर्यंत पोहचवले होते. शिक्षकांसाठी विविध ऑनलाईन स्पर्धा राबविण्यात आल्या होत्या. त्यातून जिल्ह्यातील प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना चांगले मार्गदर्शन झाले होते. त्यांच्या या अचानक झालेल्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. कोल्हापूर तालुक्यातील पन्हाळा येथील त्यांच्या मूळ गावी त्यांच्या मृत देहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

You cannot copy content of this page