१७ ते २० मार्च कालावधीत मालवण येथे निलेश राणे’ चषक स्पर्धा

*निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाबा परब मित्रमंडळ व मालवण स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजन

*💫मालवण दि.२७-:* माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाबा परब मित्रमंडळ व मालवण स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने १७ मार्च ते २० मार्च या कालावधीत मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदानावर ‘निलेश राणे’ चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती बाबा परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजप मालवण कार्यालयात बाबा परब यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी हरीश गावकर नितीन मांजरेकर, बबन रेडकर, परशुराम पाटकर, श्याम वाक्कर, विक्रांत नाईक, दिलीप कांबळी, राजू बिडये, नंदू देसाई, जॉमी ब्रिटो आदी व अन्य उपस्थित होते. यावेळी बाबा परब म्हणाले, स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून यावर्षी राज्यासह देशभरातील नामांकित संघ स्पर्धेत खेळणार आहेत. विजेत्या संघाला २ लाख ७५ हजार व माजी खासदार निलेश राणे चषक तर उपविजेता संघाला १ लाख ५० हजार रुपये यासह अन्य वैयक्तिक व आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम येणाऱ्या २४ संघांना प्रवेश दिला जाणार आहे. खुली क्रिकेट स्पर्धा असल्याने महाराष्ट्र, गोव्यासह अन्य राज्यातील संघही स्पर्धेत सहभागी होतील, असेही परब म्हणाले. स्पर्धेच्या पूर्ण नियोजनासाठी नितीन मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी २८ फेब्रुवारीपर्यंत संघांची नावे नितीन मांजरेकर (9823526969) अथवा रिझवान शेख यांच्याकडे नोंदवावीत. स्पर्धेतील सामान्यांचे युट्युब वरून थेट प्रेक्षपण केले जाणार आहे. तसेच स्पर्धेच्या निमित्ताने विविध स्तरातील मान्यवर व विशेष उल्लेखनीय सेवा देणाऱ्या व्यक्तींचाही ‘सन्मान’ केला जाणार आहे, असेही बाबा परब यांनी सांगितले.

You cannot copy content of this page