*💫कणकवली दि.२७-:* कणकवली शहरातील कॅन्सरग्रस्त शिल्पा गणेश गावडे या महिलेला तिच्या शाळकरी सवंगड्यांनी रोख ४० हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत केली. शिल्पा गावडे ही गांगो मंदिर परिसरात राहणारी महिला कॅन्सरग्रस्त असून धुणीभांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. नवऱ्याला वेडाचे झटके येतात तर १२ वर्षांची मुलगीही अबनॉर्मल आहे. शिल्पाचे कॅन्सरचे ऑपरेशन डेरवण येथील हॉस्पीटलमध्ये झाले. मात्र ऑपरेशननंतर चे वैद्यकीय उपचार आणि कुटुंबाची गुजराण करणे शिल्पाला कठीण होते. कॅन्सरग्रस्त शिल्पाला आर्थिक मदतीचे आवाहन सोशल मिडियाद्वारे करण्यात आले होते. आपली शाळकरी सवंगडी संकटात आहे हे समजताच १९९५ – ९६ च्या एस.एस.सी.बॅच ने रोख स्वरूपात स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत जमा केली. रोख ४० हजार ५०० रुपयांची ही मदत सुचिता सावंत, शिशिर परुळेकर, समर्थ राणे यांनी शिल्पा गावडे यांच्याकडे सुपूर्त केली.
शाळकरी सवंगड्यांनी केली कॅन्सरग्रस्त महिलेला मदत…
