जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली माहिती*
*💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५ हजार ८०० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आज ७ रुग्ण बरे हाेऊन घरी परतले आहेत., अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २१५ आहे. तर जिल्ह्याबाहेर उपचारासाठी गेलेल्या रुग्णांची संख्या ०६ आहे. आजपर्यंत एकूण कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण ६१८६ आहेत. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५८०० आहे. यात मृत झालेल्या रुग्णांची संख्या १६५ आहे. तर १ रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले आहे.तर २ रुग्ण आॅक्सिजन वर ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यात देवगड तालुक्यात आजपर्यंत एकूण कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण ४३५ असून सक्रिय रुग्ण २०आहेत. तर मृत्यू झालेल्यांची संख्या ९ आहे. कणकवलीमध्ये पॉजिटीव्ह रुग्ण १८८४ असून सक्रिय रुग्ण ६९ तर मृत्यूंची संख्या ४२ आहे.मालवण मध्ये पॉजिटीव्ह रुग्ण ५३३ असून सक्रिय रुग्ण १३ तर मृतांची संख्या १७ आहे. वैभववाडी मध्ये पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या १८३ असून सक्रिय रुग्ण ५ तर मृतांची संख्या ७ आहे. दाेडामार्ग मध्ये पॉजिटीव्ह रुग्ण ३५६ असून सक्रिय रुग्ण १२ तर मृतांची संख्या ४ आहे. कुडाळ मध्ये पॉजिटीव्ह रुग्ण १३९८ असून सक्रिय रुग्ण ४८ तर मृतांची संख्या ३२ आहे. सावंतवाडीत पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या ८२७ असून सक्रिय रुग्ण १८ तर मृतांची संख्या ४३ आहे. वेंगुर्लामध्ये पॉजिटीव्ह रुग्ण ५४९, सक्रिय रुग्ण २६ तर मृतांची संख्या १० आहे. तर जिल्ह्याबाहेर पॉजिटीव्ह रुग्ण २१, सक्रिय रुग्ण ४,तर मृतांची संख्या १ आहे.
