*महिन्याभरात डांबरीकरण पूर्ण न झाल्यास रास्ता रोकोचा ग्रामस्थांचा इशारा
*💫मालवण दि.२७-:* मालवण ते बेळणे कणकवली मार्गावरील मालवण आडारी पूल ते आंगणेवाडी या रस्त्याची खड्डयांनी पूर्ण चाळण झाल्याने वाहतुकीस सदर मार्ग धोकादायक बनला आहे. सर्वात जास्त रहदारीचा मार्ग असूनही रस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याने आंगणेवाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शशी आंगणे यांनी नाराजी व्यक्त करीत महिन्या भरात सदर मार्गाचे डांबरीकरण पूर्ण न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा ग्रामस्थांच्या वतिने दिला आहे. सदर मार्गावर आडारी, खैदा, महान , बिळवस फाटा, आंगणेवाडी या भागात मोठे खड्डे पडले असून रस्त्याचा पृष्ठभाग पूर्णतः खराब झाला आहे. रात्रीच्या वेळी खड्यामुळे छोटे मोठे अपघात सुद्धा घडत आहेत. आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या दर्शनास मोठ्या प्रमाणात भाविक जिल्ह्याबाहेरून येतात या भाविकांना सुद्धा या धोकादायक बनलेल्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी नि याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी आंगणेवाडी येथील जयप्रकाश आंगणे, दत्तात्रय आंगणे, दिगंबर आंगणे, गजानन आंगणे, जयवंत आंगणे, राजु सनाम, अर्जुन आंगणे, नंदु आंगणे, शशी आंगणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
