भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती
कणकवली-:सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जंगी स्वागत जिल्हा भाजपाच्या वतीने करण्यात येणार आहे. याबाबत भाजपा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत नियोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. राणे यांच्या मेडिकल कॉलेज च्या उदघाटनासाठी शहा सिंधुदुर्गात येत आहेत. अमित शहा यांच्या आगमनामुळे जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांमध्ये पसरले आहे. खासदार नारायण राणे, आमदार रवींद्र चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जिल्हा कार्यकारिणीची सभा ओसरगाव येथील महिला भवन येथे आज पार पडली. यावेळी जि प अध्यक्षा समिधा नाईक, भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.पद्मश्री पुरस्कारप्राप्त जिल्ह्याचे सुपुत्र परशुराम गंगावणे यांचा सत्कार खासदार नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला. भाजपाचे नूतन पं स सभापती मनोज रावराणे, रवी पाळेकर यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय ३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यातील बुथनिहाय बैठका घेणार आहेत.भाजपा प्रदेश सचिवपदी निवड झालेल्या माजी खासदार निलेश राणे यांचे जिल्ह्यात प्रथमच आगमन होत आहे. त्यानिमित्ताने निलेश राणे यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. श्रीराम मंदिर निर्मिती कार्यात सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन खासदार राणे यांनी केले. ग्रा.पं. निवडणुकीत विजय मिळवून देणाऱ्या भाजपच्या शिलेदारांचाही सत्कार करण्यात आला.
