धाकोरे येथे २७ रोजी शालेय विद्यार्थी चित्रकला स्पर्धा…

⚡सावंतवाडी ता.२०-: श्री देव काळोबा मित्रमंडळ आणि शाळा आजगाव वसवाचे तळे ,यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धेचे सोमवार २७ एप्रिल रोजी सकाळी ८:३० ते १०:०० वा.या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उदघाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सकाळी ८ ते ८:३० वा. होणार असून त्यानंतर लगेच स्पर्धेस सुरुवात होईल. ही स्पर्धा तीन गटात होणार असून स्पर्धेला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

( लहान गट – पहिली व दुसरी आणि तिसरी व चौथी)
इ.१ ली व २ री रंगभरण स्पर्धा
बक्षिसे
प्रथम क्रमांक रक्कम रु.३३३/-चषक व प्रमाणपत्र. ,द्वितीय क्रमांक रक्कम रु.२२२/-चषक व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक रक्कम रु.१११/-,चषक व प्रमाणपत्र,
इ.३ री व ४थी विषय – माझ्या शाळेतील परसबाग (शाळेचे व परसबागेचे चित्र अपेक्षित)
भव्य बक्षिसे
प्रथम पारितोषिक – ४४४/-, चषक व प्रमाणपत्र,व्दितीय पारितोषिक -३३३/-चषक व प्रमाणपत्र

तृतीय पारितोषिक – २२२/-चषक व प्रमाणपत्र

( मोठा गट – पाचवी ते सातवी)
पर्यावरण संवर्धन झाडे लावा झाडे जगवा अशा आधारावर अपेक्षीत
स्पर्धेसाठी बक्षिसे –
प्रथम पारितोषिक – ५५५/-चषक व प्रमाणपत्र ,व्दितीय पारितोषिक ४४४/-,चषक व प्रमाणपत्र
तृतीय पारितोषिक – ३३३/-,चषक व प्रमाणपत्र

सर्व स्पर्धकांना चित्र काढण्यासाठी कागद व पेन्सिल आयोजकांकडून पुरविले जातील. ही स्पर्धा धाकोरे गाव मर्यादित असून,

स्पर्धेत भाग घेण्यासाठी नाव नोंदणी शुक्रवार दि. २४ एप्रिल सकाळी १०:३० वाजेपर्यंत शाळा आजगाव वसवाचे तळे शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन रणशूर ८८०६७२९७५७ यांच्याकडे करावी.
स्पर्धकांना अल्पोपहारची सोय केली जाणार असून,अधिक माहितीसाठी प्रविण पालव-९४२०६५३०९१
अनिकेत कापडी-७८७५१६४५५२,रामदास गावडे- ९६७३०३५६८३ यांच्याशी संपर्क साधवा.

You cannot copy content of this page