*💫सिंधूदुर्गनगरी दि.२७-:* रेल्वेच्या नियमित कर्मचाऱ्याला कंत्राटी कर्मचाऱ्यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा केल्याच्या आरोपातून परळी बीड येथील गोविंद बाळासाहेब मुंडे (२६) याची सिंधुदुर्गचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. संशयित आरोपी च्या वतीने वकील यतिश खानोलकर, सुहास साटम, सुमन गावडे यांनी काम पाहिले. १ मे २०१७ रोजी मेंगलोर ते मुंबई जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वेच्या एसी कोचमध्ये गोविंद मुंडे या कंत्राटी परिचर आणि संजय माने हे रेल्वे कर्मचारी (मेकॅनिक ) यांच्यात वादावादी झाली होती. एसी कोच मधील लिनन बॉक्समध्ये पॅसेंजर ला का जागा दिली. असे विचारना माने यांनी मुंडे यांच्याकडे केली होती याचा राग आल्याने मुंडे याने हातातील मोबाईल मारून दुखापत केली होती. तसेच शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. रात्री दहा-पंधरा च्या सुमारास कणकवली रेल्वे स्थानक सोडल्यानंतर ही घटना घडली होती. याप्रकरणी संजय माने यांनी चिपळूण पोलिसात तक्रार दिली होती त्यानुसार संशयित आरोपी वर भादवि कलम ५५३, ३३२, ३२४, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल झाला होता कणकवली परिसरात ही घटना घडल्याने तपास कणकवली पोलिसांकडे सोपविण्यात आला होता दरम्यान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात झालेल्या या खटल्याच्या सुनावणीत संशयितांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद कायम आणून न्यायालयाने मुंडे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
मारहाण प्रकरणी कंत्राटी रेल्वे कर्मचाऱ्याची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता…
