विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..
⚡सावंतवाडी ता.२०-:
मळेवाड (परबवाडी) येथे बुधवार दिनांक २९ एप्रिल रोजी श्री साईबाबांचा १५ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न होत असून, मंदिरात
सकाळी ८:३० वा. होम हवन,सकाळी१० वा. श्री सत्यनारायण महापूजा, ,आरती, तीर्थप्रसाद,दुपारी १:३० वा. महाप्रसाद,सायं. ७वा. स्थानिकांची भजने तसेच रात्रौ ८ वाजता
देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण यांचा ट्रिकसीनयुक्त “व्यंकट रमणा जय गोविंदा” अर्थात ‘महिमा तिरुपती बालाजीचा”
हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यंगस्टार कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ परबवाडी व ग्रामस्थांनी केले आहे.
