माडखोलमधील दोन्ही नदीप्रवाह झाडीमुक्त करा

ग्रामस्थांचे ज़िल्हाधिकाऱ्यांना निवेदन;३० पर्यंत कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा सावंतवाडी ता.२३– माडखोल ग्रामपंचायत क्षेत्रात दोन नदी प्रवाह असून हे नदीपात्र पूर्णपणे झाडाझुडपांनी आच्छादलेले आहे. यामुळे रात्री अपरात्री जास्त अति वृष्टी झाल्यास पाण्याचा प्रवाहास अडथळा निर्माण होऊन आजूबाजूच्या लोकवस्तीमध्ये पाणी शिरून धोका निर्माण होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे यामुळे हा नदीपात्रातील वाढलेले जंगल…

Read More

संतोष परब हल्लाप्रकरणी संशयितांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ

कमालीची गुप्तता पाळत तपास सुरू कणकवली 23 डिसेंबर (प्रतिनिधी)- जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निवडणूक प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पाच संशयितांची पोलीस कोठडी संपली असल्याने पुन्हा आज दुपारी कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. करंजे गावचे माजी सरपंच तथा जिल्हा बॅकेचे अध्यक्ष…

Read More

अटलजींना २५ रोजी काव्यात्मक श्रद्धांजली

*⚡वेंगुर्ला ता.२३-:* माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना काव्यात्मकरित्या श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वेंगुर्ला भाजप, बॅ.खर्डेकर महाविद्यालय, आनंदयात्री वागङ्मय मंडळ, वेताळ प्रतिष्ठान, नगर वाचनालय व किरात ट्रस्ट आदी संस्थाच्या सहकार्याने २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कॅम्प येथील घोडेबाव गार्डनमध्ये मध्ये अटलजींच्या कविता वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी काव्यवाचन कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सर्व…

Read More

नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

*⚡वेंगुर्ला ता.२३-:* वेंगुर्ला तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने वेंगुर्ला नगरपरिषद पुरस्कृत ‘नगराध्यक्ष चषक २०२१‘ कब्बडी प्रिमियर लीगचे उद्घाटन बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर २१ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांचे हस्ते करण्यात झाले. यातील विजेत्यांना ७०००, ४००० व ३००० अशी सांघिक व इतर वैयक्तिकही बक्षिसे देण्यात येणार आहेत. उद्घाटनप्रसंगी प्राचार्य विलास देऊलकर, प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे,…

Read More

रघुनाथ खानोलकर यांचा भाजपातर्फे सत्कार

*⚡वेंगुर्ला ता.२३-:* आडेली जिल्हापरिषद मतदार संघातील खानोली ग्रामपंचायतीच्या वार्ड क्र. २च्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार रघुनाथ उर्फ अण्णा खानोलकर यांनी ९९ मते मिळवित शिवसेना उमेदवार रुपाली किरण प्रभूखानोलकर यांचा पराभव केला. त्याबद्दल भाजपाच्या वेंगुर्ला तालुका कार्यालयात तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते रघुनाथ खानोलकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष…

Read More

उघड्या गटाराकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष

वेंगुर्ला प्रतिनिधी– वेंगुर्ला शहरातील वॉर्ड नं.१७ मधील आनंदवाडी ते पॉवर हाऊस समोरील गटाराचे काम सन २०१९-२०च्या दरम्यान करण्यात आले. त्यावेळी त्या गटारांची खोली व रुंदी वाढविण्यात आली. परंतु, सदरचे काम अर्धवट अवस्थेत आहे. गटाराची खोली वाढलेली असल्याने व त्यावर झाकण नसल्याने याठिकाणचे गटार हे धोकादायक असून त्यामध्ये पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही….

Read More

झायलो गाडीची अज्ञात व्यक्तीने केली तोडफोड

कणकवलीतील प्रकार *⚡कणकवली ता.२३-:* कणकवली गोकुळधाम हॉटेल समोरील ब्रिज खाली उभी करण्यात आलेल्या एम. एच .12 पुणे पासिंगच्या झायलो गाडीवर अज्ञात इसमाने गाडीच्या काचेवर दगड मारत काच फोडली आहे. त्यामुळे या गाडीची तोडफोड झाल्याने कुठेतरी कणकवली शहरातील वातावरण तणावाचे बनले आहे. मागील काही दिवस कणकवली राजकीय वातावरण तणावाचे होत असून शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या…

Read More

अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना पदोन्नती

*⚡ओरोस ता.२३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांची निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी पदी पदोन्नती झाली आहे. त्यामुळे त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सोडला आहे. त्यांच्या पदाचा पदभार निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस कर्मचारी संघटनेच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष  सत्यवान माळवे, कोषाध्यक्ष शाम…

Read More

कोकणातील नद्यांचे गाळ काढण्याचे केंद्रीय मंत्र्यांचे आदेश

भाजपचे प्रमोद जठार, विशाल परब यांनी वेधले लक्ष सावंतवाडी : कोकणातील नद्यांना येणारा महापूर व त्यामुळे होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी येथील नद्यांचा गाळ काढण्यात यावा, या मागणीसाठी भाजपचे ज़िल्हाध्यक्ष प्रमोद जठार व युवा नेते विशाल परब यांनी आज केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांची आज दिल्लीत भेट घेतली. राज्यमंत्री चौबे यांनी तात्काळ…

Read More

अन्यथा एकही गाडी महाराष्ट्रात फिरकू देणार नाही…

युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांचा इशारा *सावंतवाडी :* सावंतवाडी शहरात आज युवासेनेच्या माध्यमातून कर्नाटक पासिंगच्या गाड्या अडवून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजाचा कर्नाटक राज्यात वारंवार होणारा अवमान महाराष्ट्र खपवून घेणार नाही, यापुढे अशी घटना घडल्यास महाराष्ट्रात कर्नाटक राज्याची एकही गाडी फिरकू देणार नाही, असा इशारा युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर…

Read More
You cannot copy content of this page