ग्रामस्थांचे ज़िल्हाधिकाऱ्यांना निवेदन;३० पर्यंत कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा
सावंतवाडी ता.२३– माडखोल ग्रामपंचायत क्षेत्रात दोन नदी प्रवाह असून हे नदीपात्र पूर्णपणे झाडाझुडपांनी आच्छादलेले आहे. यामुळे रात्री अपरात्री जास्त अति वृष्टी झाल्यास पाण्याचा प्रवाहास अडथळा निर्माण होऊन आजूबाजूच्या लोकवस्तीमध्ये पाणी शिरून धोका निर्माण होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे यामुळे हा नदीपात्रातील वाढलेले जंगल झाडेझुडपे कचरा गाळ 30 एप्रिल पर्यंत उपसा करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदानाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून 30 एप्रिल पर्यंत शासनाने याची दखल न घेतल्यास 1 मे रोजी तहसीलदार कार्यालयासमोर माडखोल करिवडे ग्रामस्थांच्या उपोषणाचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे
या निवेदनावर संजय भिकाजी लाड सुरेंद्रनाथ तुकाराम राऊळ राजकुमार लक्ष्मण राऊळ सूर्यकांत यशवंत राऊळ जॅकी डिसोजा संतोष सखाराम राऊळ अभिषेक रामकृष्ण चव्हाण धोंडी गुणाजी जाधव नारायण गोविंद सुकी सिद्धेश चंद्रकांत शिरसाट आदि 60 जणांनी या निवेदनावर साह्य केल्या आहेत या निवेदनात असे म्हटले आहे की माडखोल ग्रामपंचायत क्षेत्रात 2 नदी प्रवाह वाहत आहेत ह्या नद्या दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात तुडुंब भरून वाहत असतात मात्र याची नदी पात्रे पूर्णपणे झाडाझुडपांनी आच्छादलेली आहेत त्यामुळे जास्त अतिवृष्टी झाल्यास पाण्याचा प्रवाह बंद होऊन आजूबाजूच्या लोकवस्तीमध्ये पाणी शिरून रात्री-अपरात्री धोका निर्माण होऊ शकतो यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून जीवित हानी देखील नाकारता येत नाही तर या अगोदर 23 जुलै 2021 रोजी रात्रीच्या सुमारास अतिवृष्टी होऊन मोठा पूर आला होता या पुरात अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे यामुळे नदीपात्रातील वाढलेले जंगल झाडेझुडपे व कचरा नदी पात्र स्वच्छ करून ग्रामस्थांवर येणारी आपत्ती दूर करावी तसेच नदीपात्र स्वच्छ नसल्याने गाळ उपसा न झाल्याने पाण्याचा प्रवाह आजूबाजूच्या परिसरात घुसून शेतकऱ्यांच्या भातशेती फळझाडे केळी लागवड व व्यवसायिक, छोटे-मोठे दुकानदार यांचे नुकसान होत आहे याकडे शासनाने लक्ष देऊन तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे तसेच तालुक्यातील इतरही नदी पात्राची पाहणी करून गाळ उपसा करण्यात यावा अतिवृष्टीमुळे पुराचा धोका टाळण्यासाठी नदीपात्र साफसफाई व गाळ उपसा 30 एप्रिल 2022 पर्यंत शासनाने दखल न घेतल्यास 1 मे 2022 रोजी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे
