Headlines

वडाचापाट शांतादुर्गा हायस्कुलमध्ये गणित दिन साजरा

*⚡मालवण ता.२३-:* वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कुल मध्ये ‘राष्ट्रीय गणित दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत गणिती रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, तसेच प्रतिकृती, तक्ते, गणित विषयाशी निगडित संदर्भ ग्रंथांचे प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी भंडारी एज्युकेशन सोसायटीचे सह खजिनदार अभिमन्यू कवठणकर,आणि दयानंद देसाई(शेतीतज्ञ) यांची उपस्थिती लाभली. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जे.एन.पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषविले. वक्तृत्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी शकुंतला देवी (भारतीय गणिततज्ञ), श्रीनिवास रामानुजन, आर्यभट्ट, भास्कराचार्य,पायथागोरस आदी गणिततज्ञांच्या चरित्राचा आढावा घेतला. कार्यक्रमाला गणित शिक्षक प्रसाद कुबल यांचे मार्गदर्शन लाभले. प्रसाद कुबल यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर आधारित ध्वनिफीत विद्यार्थ्यांना ऐकवली. रामानुजन यांनी कशा रितीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गणितीय क्षेत्रात आपला ठसा उमटवला हे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगतानाच विद्यार्थ्यांना गणिती कोडे घालून मनातील संख्या कशी ओळखता येते याचा उलगडा केला. या कार्यक्रमातील स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून प्रशालेतील सहाय्यक शिक्षिका कुमारी प्रतिभा केळुसकर, सौ.वेदिका दळवी,आणि प्रीती सनये या लाभल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद कुबल यांनी केले. तर आभार सौ.वेदिका दळवी यांनी मानले.

You cannot copy content of this page