वैभववाडी प्रतिनिधी वाभवे – वैभववाडी नगरपंचायतच्या चार जागांचे आरक्षण आज जाहीर झाले आहे. उपविभागीय अधिकारी उपेंद्र तामोरे तसेच वैभववाडी मुख्याधिकारी सुरज कांबळे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. लहान विद्यार्थ्याकडून चिठ्ठी काढण्यात आली. या सोडत प्रक्रियेत प्रभाग क्रमांक 3 – महिला, प्रभाग क्रमांक 5 – महिला, प्रभाग क्रमांक 15 – सर्वसाधारण (खुला), प्रभाग क्रमांक 16 – सर्वसाधारण (खुला) या पद्धतीने आरक्षण जाहीर झाले आहे. हा सोडत कार्यक्रम महाराणा प्रताप कलादालन या ठिकाणी पार पडला.
वैभववाडी उर्वरित चार जागांचे आरक्षण जाहीर…
