प्लास्टिक उत्पादनावर बंदी आणून, सुतार कारागिरांचे उद्योगधंदे सावरावेत…

वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुका सुतार शिल्पकार समाज वैभववाडी यांच्या वतीने आज वैभववाडी तहसीलदारांना सुतार समाजाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा सुतार शिल्पकार समाज अध्यक्ष आनंद मेस्त्री यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

सुतार समाजावर जी उपासमारीची वेळ आलेली आहे त्याचे कारण प्लास्टिक खुर्च्या, प्लास्टिक टेबल, लोखंडी छप्पर असे नवीन उद्योगधंदे आहेत. त्यामुळे सुतार कामाच्या शाळेसह असंख्य सुतार कारागिरांचे धंदे बंद झाले आहेत. म्हणून शासनाने या प्लास्टिकच्या उत्पादनावर बंदी आणावी व सुतार कारागिरांचे उद्योगधंदे सावरावे, याविषयी हे निवेदन देण्यात आले. यावेळी सोबत डिके सुतार, रितेश सुतार, प्रताप सुतार, विठोबा सुतार, रमेश पांचाळ, रमाकांत पांचाळ, सुरेश सुतार, अनिल मिस्त्री, बाळा पांचाळ, मधुकर सुतार, पांडुरंग सुतार, संजय सुतार, सुनील पांचाळ, सूर्यकांत सुतार, तुकाराम सुतार, रामचंद्र सुतार, चंद्रकांत सुतार असे असंख्य सुतार बांधव उपस्थित होते.

You cannot copy content of this page