रमाई महिला मंडळ तालुका अध्यक्ष पदी शारदा कांबळी यांची सर्वानुमते निवड

वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ (रजि.) अंतर्गत माता रमाई महिला मंडळ वैभववाडी महिला तालुका कार्यकारिणीच्या जम्बो कार्यकारिणीची निवड पुढील ५ वर्षाकरिता आज वैभववाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात जाहीर करण्यात आली. यावेळी वैभववाडी तालुका महिला अध्यक्षपदी बौद्ध समाजातील सामाजिक कार्यकर्त्या तसेच माजी समाजकल्याण सभापती सौ.शारदा शरद कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे विद्यमान अध्यक्ष श्री.भास्कर जाधव त्यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात पार पडलेल्या आजच्या कार्यकारणी निवडीच्या सभेला तालुका संघाचे कार्यकर्ते रवींद्र पवार,शरद कांबळे, संजय जंगम,मारुती कांबळे, संतोष कदम,मंगेश कांबळे, रुपेश कांबळे, प्रफुल्ल जाधव,धर्मरशित जाधव,टी सी जाधव आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. माता रमाई महिला मंडळ तालुका वैभववाडी ग्रामीण कार्यकरणी पुढील प्रमाने जाहीर करण्यात आली. अद्यक्ष – सौ शारदा शरद कांबळे,उपाध्यक्ष – सौ अक्षता अजय कांबळे,सौ स्मिता वीजय पवार,सौ. प्रतिशा प्रमोद जाधव,सौ.जागृती रवींद्र कांबळे, सौ.प्रज्ञा धर्मरशीत जाधव,कार्याध्यक्ष – सौ.मोहिणी मोहन कांबळे,सरचिटणीस- सौ रुचिता रामचंद्र कदम सहसचिव – सौ गीता संतोष जाधव,सौ दिव्या दीपक भोसले,सौ समता संजय कांबळे, सौ शिल्पा संतोष यादव,खजिनदार – सौ सुवर्णा श्रीपत यादव,हिशोब तपासनीस – सौ ऋचा रवींद्र पवार,प्रमुख सल्लागार – सौ मनस्वी मंगेश कांबळे, सौ नीलम बाळकृष्ण कांबळे, सौ अर्चना आनंद जंगम आदी १७ महिलांची जम्बो कार्यकारणी आज वैभववाडी बौद्ध सेवा संघ तालुका वैभववाडी च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते जाहीर केली.

वैभववाडी तालुका बौद्ध समाज महिला – पुरुष बांधवांनी माझ्यावर विश्वास दाखवून माता रमाई महिला मंडळ तालुका अध्यक्ष पदी निवड केली त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचे आभार व्यक्त करते. व मला दिलेल्या पदाला पूर्ण न्याय देऊन येथील महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच महिलांचे संघटन बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नावनिर्वाचित अध्यक्षा सौ शारदा शरद कांबळे यांनी यावेळी सांगितले. फोटो- फोटो- शारदा कांबळे

You cannot copy content of this page