संतोष परब हल्लाप्रकरणी संशयितांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ

कमालीची गुप्तता पाळत तपास सुरू

कणकवली 23 डिसेंबर (प्रतिनिधी)- जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निवडणूक प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पाच संशयितांची पोलीस कोठडी संपली असल्याने पुन्हा आज दुपारी कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

करंजे गावचे माजी सरपंच तथा जिल्हा बॅकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख म्हणून काम करणाऱ्या संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी 11 वा सुमारास नरडवे रोड येथे प्राणघातक हल्ला झाला होता या दरम्यान पोलिसांनी नाकाबंदी करत इनोव्हा कारसह चौघांना ताब्यात घेतले होते या चार सवंशयितांना न्यायालयाने 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.या दरम्यान आणखी एका संशयिताला पोलिसांनी काल ताब्यात घेतले. या पाच ही जणांना आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले . कणकवली न्यायालयात सदर गुन्ह्यातील आरोपींना हजर केले असता सरकारी पक्षातर्फे आरोपींना पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. सदर आरोपी सराईत आहेत, या गुन्ह्यात अन्यही काही आरोपींना हात आहे. अन्य दोन आरोपींना अटक करावयाची आहे. त्यामुळे पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे पोलिसांनी केली. त्यावर आरोपींच्यावतीने वकिलांनी तपास करण्यासाठी ५ दिवसांची कोठडी दिली होती. आता कोठडीत वाढ करु नये, असे म्हणणे मांडले. त्यावर सुनावणी करत कणकवली न्यायालयाने पाचही आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे संशयित आरोपींना न्यायालयात हजर करताना पोलिसांनी पूर्ण गुप्तता पाळली होती.विशेष म्हणजे बुरखे घालूनच संशयित आरोपींना हजर करण्यात आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तसेच न्यायालयाच्या बाहेर देखील दंगल नियंत्रण पथक व विशेष पोलीस पथक तैनात ठेवण्यात आले होते. याप्रकारणाबाबत कमालीची गुप्तता राखत पोलीस तपास सुरू असल्याने पोलिसांनी अधिक माहिती देण्याचे टाळले.

You cannot copy content of this page