अटलजींना २५ रोजी काव्यात्मक श्रद्धांजली

*⚡वेंगुर्ला ता.२३-:* माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना काव्यात्मकरित्या श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वेंगुर्ला भाजप, बॅ.खर्डेकर महाविद्यालय, आनंदयात्री वागङ्मय मंडळ, वेताळ प्रतिष्ठान, नगर वाचनालय व किरात ट्रस्ट आदी संस्थाच्या सहकार्याने २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कॅम्प येथील घोडेबाव गार्डनमध्ये मध्ये अटलजींच्या कविता वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी काव्यवाचन कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सर्व संस्थांच्यावतीने प्रसन्ना देसाई यांनी केलं आहे.

You cannot copy content of this page