कोकणातील नद्यांचे गाळ काढण्याचे केंद्रीय मंत्र्यांचे आदेश

भाजपचे प्रमोद जठार, विशाल परब यांनी वेधले लक्ष

सावंतवाडी : कोकणातील नद्यांना येणारा महापूर व त्यामुळे होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी येथील नद्यांचा गाळ काढण्यात यावा, या मागणीसाठी भाजपचे ज़िल्हाध्यक्ष प्रमोद जठार व युवा नेते विशाल परब यांनी आज केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांची आज दिल्लीत भेट घेतली. राज्यमंत्री चौबे यांनी तात्काळ या नद्यांचे गाळ करण्यासंदर्भात आदेश दिले असून यासंदर्भात निधीची तरतूद केली आहे, अशी माहिती जठार व परब यांनी दिली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार प्रमोद जठार आणी भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांची दिल्ली येथे आज त्यांच्या दालनात भेट घेतली कोकणात मोठ्या प्रमाणात महापूर येतो आणि यावेळी हाहाकार उडतो. या नद्यांचा गाळ काढण्यासंदर्भात चिपळुणात संघर्ष मोर्चा निघाला होता. तब्बल पाच हजार लोकांनी चिपळूणमध्ये हा संघर्ष मोर्चा काढला होता. मात्र याकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले होते. पावसाळ्यात लोकांचे होणारे हाल लक्षात घेऊन प्रमोद जठार व विशाल परब यांनी यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्यमंत्री रामदास आठवले व खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. यानंतर त्यांच्याशी या विषयावर प्रदीर्घ चर्चा करून यासंदर्भात नागरिकांचे होणारे हाल सुटण्यासाठी साकडे घातले. यानंतर या भाजपच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रालयात माजी आमदार प्रमोद जठार व विशाल परब यांनी पर्यावरण मंत्री अश्विनी कुमार चौबे यांची भेट घेवून कोकणातील नद्यांना येणाऱ्या पुरामुळे काय स्थिती होते, हे वस्तुस्थितीदर्शक पटवून सांगितले. येथील जनतेच्या व्यथा त्यांनी मंत्री चौबे यांच्याकडे मांडून कोकणातील नद्यांचा गाळ काढण्याचे आग्रही मागणी लावून धरली. यानंतर केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी तात्काळ या नद्यांचे गाळ करण्यासंदर्भात आदेश दिले असून यासंदर्भातील गाळ काढण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. यामुळे कोकणातील शेतकरी व नागरिक यांचा पावसाळ्यातील महापुरामुळे येणाऱ्या संकटाचा प्रश्न सुटणार आहे.ही भेट झाल्याची माहिती भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार व युवा नेते विशाल परब यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page