अन्यथा एकही गाडी महाराष्ट्रात फिरकू देणार नाही…

युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांचा इशारा

*सावंतवाडी :* सावंतवाडी शहरात आज युवासेनेच्या माध्यमातून कर्नाटक पासिंगच्या गाड्या अडवून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजाचा कर्नाटक राज्यात वारंवार होणारा अवमान महाराष्ट्र खपवून घेणार नाही, यापुढे अशी घटना घडल्यास महाराष्ट्रात कर्नाटक राज्याची एकही गाडी फिरकू देणार नाही, असा इशारा युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी दिला.

आज गवळी तिठा इथे शिवसेना, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कर्नाटक सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. कर्नाटकमध्ये काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. ही घटना ताजी असतानाच दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा काही तरुणांकडून असा प्रकार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा निषेध म्हणून युवासेनेच्या माध्यमातून एकही कर्नाटकची गाडी महाराष्ट्र येऊ दिली जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला. युवासेना उपजिल्हाधिकारी सागर सोमकांत नाणोसकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, जोपर्यंत संबंधितांवर कठोर कारवाई होत नाही. तोपर्यंत एकही गाडी महाराष्ट्रात येऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. आपल्या राजाच्या मानसन्मानासाठी एकत्र येऊन या कानिडी भडव्यांना जशास तसं उत्तर देऊ असा इशारा सागर नाणोसर यांनी दिला. यावेळी पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सुरेश भोगटे, विशाल सावंत, शब्बीर मणियार, अजित सांगेलकर, गुणाजी गावडे, देवेंद्र टेंमकर, संतोष जोईल, इफ्तेकार राजगुरू, प्रतिक बांदेकर, चंद्रकांत कासार, पिंट्या परब, सचिन गांवकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page