*⚡ओरोस ता.२३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांची निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी पदी पदोन्नती झाली आहे. त्यामुळे त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सोडला आहे. त्यांच्या पदाचा पदभार निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस कर्मचारी संघटनेच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सत्यवान माळवे, कोषाध्यक्ष शाम लाखे, परमेश्वर फड, अशोक पोळ, नायब तहसीलदार संतोष खरात आदी उपस्थित होते. दरम्यान, गेली चार वर्षे जोशी हे जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.
अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना पदोन्नती
