कणकवलीतील प्रकार
*⚡कणकवली ता.२३-:* कणकवली गोकुळधाम हॉटेल समोरील ब्रिज खाली उभी करण्यात आलेल्या एम. एच .12 पुणे पासिंगच्या झायलो गाडीवर अज्ञात इसमाने गाडीच्या काचेवर दगड मारत काच फोडली आहे. त्यामुळे या गाडीची तोडफोड झाल्याने कुठेतरी कणकवली शहरातील वातावरण तणावाचे बनले आहे.
मागील काही दिवस कणकवली राजकीय वातावरण तणावाचे होत असून शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आज संशयित पाच आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते आणि त्यानंतर लगेचच गोकुळधाम हॉटेल समोरील ब्रिज खाली उभी असलेल्या एम एच 12 पुणे पासिंग गाडीवर अज्ञात इसमाने दगड मारून दर्शनि काच फोडल्याने कणकवलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे
