नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांनी जनतेला दिलेला शब्द पाळला…

प्रभाग पाचमध्ये बंदिस्त गटार व रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन:नागरिकांकडून आभार..

⚡सावंतवाडी ता.१३-: येथील प्रभाग क्रमांक ५ मध्ये बंदिस्त गटाराचे तसेच माठेवाडा येथील काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन काल स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.

यावेळी नगरसेवक श्री. सुधीर आडीवरेकर यांनी निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेला शब्द प्रत्यक्षात पूर्ण केल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले.

या भूमिपूजन सोहळ्याला नगरसेविका दुराळी रांगणेकर, नगरसेविका दिपाली भालेकर, अमित गवंडळकर, सुमित वाडकर, शंभू विरनोडकर, नागेश जगताप आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page