कणकवली तालुक्यात ५४ लाख २२ हजारांचे नुकसान…

वादळी वाऱ्यासह पावसाचा – तडाखा, नुकसानीचा पंचनामा..

कणकवली : तालुक्यात ९ मे रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांवर झाडे तसेच फांद्या तुटून पडल्याने नुकसान झाले होते. त्याचबरोबर गोठे, दुकाने, पोल्ट्री, समाजमंदिर, अंगणवाडी यांची हानी झाल्याने ५४ लाख २२ हजार ५६६ रुपये इतके नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे.

कणकवली तालुक्यात शनिवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची पंचयादी महसूल विभागाकडून करण्यात आली आहे. कणकवली शहरातील दोन घरांची अंशतः हानी झाल्याने १५ हजार रुपये, दोन दुकानांचे २५ हजार ८०० रुपये, एका कापड दुकानाचे १ लाख ७५ हजार रुपये, हरकुळ बुद्रुकमधील २२ घरांचे अंशतः नुकसान होऊन ३ लाख ७ हजार ४६१ रुपये, एका शाळेचे ४ हजार ३७५ रुपये, एक अंगणवाडीचे ३ हजार ५०० रुपये, नागवेमधील २४ घरांची अशंतः हानी झाल्याने २ लाख ५० हजार रुपये, एका शाळेचे ५१ हजार रुपये, एका अंगणवाडीचे हजार रुपये, जाणवलीमधील ४ घरांचे अंशतः नुकसान झाल्याने ५२ हजार ४०० रुपये, एका गोठ्याचे ८ हजार रुपये, सुतार शाळेचे २ लाख ९४ हजार रुपये, एक अंगणवाडी ६ हजार रुपये, साकेडीमधील २ घरे अंशतः हानी १४ हजार रुपये, एक गोठा ६ हजार रुपये, डामरे १ अंशतः घर १९ हजार रुपये, कोंडये १ अंशतः घर २६ हजार रुपये, दारूम ३ अंशतः घरे ३१ हजार रुपये, खारेपाटण १७९ अंशतः घरे १३ लाख ८५ हजार ५७७ रुपये, पूर्णतः एक घर १ लाख ५० हजार रुपये, चार गोठे ३५ हजार २०० रुपये, अंशतः इमारतीवरील पत्र्यांच्या ३ शेड १ लाख २४ हजार ८७५ रुपये, पूर्णतः इमारतीवरील पत्र्याच्या २ शेड ३ लाख ८७ हजार ६४५ रुपये, अशंतः ४ शाळांचे ७८ हजार ५१२ रूपये, नडगिवे येथे अंशतः दोन घरांचे ८ हजार ७९४ रुपये, वायंगणी २३ घरांचे अंशतः नुकसान १ लाख ९२ हजार ६०१ रुपये, एका गोठ्याचे १ हजार ५९९ रुपये, एका शाळेचे १४०० रुपये, चिंचवली २५ घरे २ लाख ५८ हजार रुपये, १ गोठा २४ हजार रुपये, १ पोल्ट्री १८ हजार रुपये, कुरंगवणे अंशतः ३ घरे १६ हजार ५०० रुपये, १ गोठा ९ हजार रुपये, वारगाव अंशतः ४ घरे १५ हजार ५० रुपये, उत्तर दक्षिण गावठाण जिल्हा परिषद शाळा एक ३२ हजार ५०० रुपये, उत्तमनगर अंशतः २० घरे २ लाख २३ हजार ७५७ रुपये, श्रीनगर अंशतः एक घर ६ हजार २०० रुपये, पिंपळेश्वरनगर ७ हजार ५०० रुपये, राजनगर अंशतः सात घरे १ लाख ५० हजार रुपये, लिंगेश्वर नगर अंशतः एक घर ७ हजार ५०० रुपये, दारिस्ते अंशतः चार घरे १३ हजार रुपये, शिवडाव अंशतः तीन घरे ११ हजार ९०० रुपये, गोठा व अन्यधान्य दुकान २२ हजार १०० रुपये, अंशतः तीन घरे १९ हजार ७२५ रुपये, आश्रम एक ४ हजार ५९५ रुपये, करंजे घरे २६ ची अंशतः हानी २ लाख ७८ हजार रुपये, १ गोठा ५१ हजार रुपये, समाजमंदिर एक ४२ हजार ५०० रुपये, तीन शाळा ३ लाख ५२ हजार रुपये असे मिळून ५४ लाख २२ हजार ५६६ रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी नोंद महसूल विभागाने केली आहे.

You cannot copy content of this page