सबनीसवाड्यात धोकादायक फांद्या हटवल्या; निशांत तोरसकर यांच्या पाठपुराव्याला यश…

आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाची तातडीने कार्यवाही; नागरिकांकडून समाधान व्यक्त, नगराध्यक्षांचेही मानले आभार..

⚡सावंतवाडी ता.१३-:
सबनीसवाडा येथील मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून धोकादायक अवस्थेत लोंबकळणाऱ्या झाडांच्या फांद्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या समस्येकडे निशांत तोरसकर यांनी जातीनिशी लक्ष घालत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच दोन दिवसांत कार्यवाही न झाल्यास संबंधित फांद्या स्वतः तोडून नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आणून टाकू, असा कठोर इशाराही त्यांनी दिला होता.
निशांत तोरसकर यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत संबंधित झाडांच्या धोकादायक फांद्या हटवण्याची कार्यवाही पूर्ण केली. त्यामुळे संभाव्य अपघात टळला असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
याबाबत त्वरित कार्यवाही केल्याबद्दल मुख्याधिकारी, नगराध्यक्ष तसेच नगरपालिकेचे कर्मचारी दीपक म्हापसेकर आणि गजानन परब यांचे नागरिकांतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

तसेच सफाई कर्मचारी बाळा आंबेरकर, शंकर पालव आणि लवू गावडे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून धोकादायक फांद्या तोडून परिसराची साफसफाई केली. त्यांच्या धाडसी कामगिरीचे नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.
निशांत तोरसकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर प्रशासनाला हालचाल करावी लागली आणि धोकादायक फांद्या हटवण्याची कार्यवाही पूर्ण झाली. परिणामी मोठा अनर्थ टळला असून नागरिकांनी निशांत तोरसकर यांच्यासह संबंधित प्रशासन व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page