आंबोलीतील हिंदू संमेलनात धर्मरक्षणासाठी एकीचे आवाहन…

आमदार महेश लांडगे यांचे वक्तव्य
माऊली मंदिर येथे तीन गावांच्या संयुक्त हिंदू संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

⚡आंबोली,ता.१३-: हिंदू धर्माला हजारो वर्षाची परंपरा आणि श्री रामाची मर्यादा आहे.नाशिक,पुणे,कोल्हापूर,यवतमाळ,लातूर,मुंबई सगळीकडे महिला मुलींवर अत्याचार करून त्यांना धर्म परिवर्तन करण्यासाठी उद्युक्त केल जात आहे.यात जिहादी आणि मुस्लिम आहेत.हिंदू मध्ये एकी नसल्यामुळे त्यांचा माज वाढला आहे.धर्म सुरक्षित राहिला तरच आपण सुरक्षित आणि पुढची पिढी.हिंदू नी जागरूक राहून धर्मासाठी कार्य करा असे प्रतिपादन आंबोली चौकुळ गेळे गावच्या हिंदू संमेलन माऊली मंदिर येथे पुणे भोसरी येथील आमदार महेश दादा लांडगे यांनी केले.

आंबोली माऊली मंदिर येथे हिंदू संमेलन तीन गावाचा मिळून करण्यात आले. यावेळी श्रीराम मंदिर ते माऊली मंदिर भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.यात छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री रामांचा रथ देखावा तसेच सिंहगर्जना कणकवली येथील ढोलपथक पारंपरिक आणि भगवा वेश भगवे झेंडे अशी शोभा यात्रा काढण्यात आली. आंबोली माऊली मंदिर येथे व्यासपीठावर प्रमुख अतिथी भोसरी पुणे येथील आमदार महेश दादा लांडगे ,विश्व् हिंदू परिषद चे डॉ.पंकज दिघे,आंबोली च्या मूळ व सद्या राहणार आळंदी येथील कीर्तनकार सायली ताई महाराज गावडे यांनी संबोधन केले.

यावेळी कीर्तनकार सायली ताई म्हणाल्या, औरंगजेबाचा अत्याचार सहन केला परंतु धर्मासाठी कधीही तडजोड केली नाही. त्याग केला.छत्रपती शिवाजी राजांनी हे रयतेचे स्वराज्य निर्माण केले आणि हे राज्य व्हावे अशी श्रींची इच्छा असे सांगितले.छत्रपतींचा आदर्श घेऊन धर्माची वाटचाल केली पाहिजे.यावेळी तीने कर्तोजी गुजर यांचे उदाहरण दिले.विश्व् हिंदू परिषदेचे डॉ. पंकज दिघे म्हणाले,आर.एस.एस.चे शतक पूर्ती वर्ष सुरु आहे.त्यामुळे हिंदू संमेलने सगळीकडे घेतली जात आहेत.1925 साली संघ परिवाराचे कार्य सुरु झाले.त्यावेळी पंडित नेहरूंनी मी अपघाताने चुकून झालेला हिंदू आहे.त्यावेळी हेडगेवार यांनी सांगितले हे हिंदू राष्ट्र आहे.त्यांनी डॉ.पेक्षा न करता विवाह न करता संपूर्ण आयुष्य संघ परिवार आणि हिंदू धर्मासाठी कार्य केले.याआधी ताज महाल भेट दिला जायचा आता श्री राम मूती भेट दिली जाते.आताचे पंतप्रधान राम मंदिर,कुंभमेला अशा धर्म कार्यात दिसतात.या धर्म कार्यात पाच पंचसूत्रे सांगितली आहेत.कुटुंब,समाजिक समरसता, पर्यावरण, स्व आणि वेष, नागरिक कर्तव्य. छोट्या कुटुंबामुळे टीव्ही सिरीयल मधून स्वैराचार सोशल मिडीयमधून अश्लील आणि नको त्या गोष्टी.मीडिया प्रचार यामुळे मूल वाम मार्गाला जात आहेत.कुटुंबात प्रेम मिळत नाही आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे एक दोन मूल असणारे कुटुंब सुद्धा संपत आहेत.समाजात जाती जातीत फुट घालून राजकारणी जातीय. राजकारण करीत आहेत.ही जातीय दरी नष्ट केली पाहिजे.अठरा प्रगट जाती या हिंदूच आहेत.त्यांची एकी असली पाहिजे.पर्यावरण सगळीकडे प्लास्टिक चे ढीग साचत आहेत.तर विस वर्षांनी उजाड होत जाईल.त्यासाठी स्वतः पासून सुरुवात केली पाहिजे.रशियन रशियन मधून जर्मणी जर्मनं फ्रान्स फेंच पण इंग्रजाच्या इंग्रजी भाषेमुळे खरे व्यवहारिक ज्ञान मिळत नाही ते स्व भाषेतूनच मिळते.भाषेसाठी वाद न करता स्व भाषेलाच प्राधान्य द्यावे.वेष पारंपरिक संस्कृती जपणारा असला पाहिजे.हिंदू समाजात स्वत्वाची भावना असली पाहिजे.प्रतिकूल परिस्थिती जपान पुढे गेला तो तेथील नागरिकात स्व कर्तव्य जाणीव असल्यामुळे. त्यामुळे हा देश माझा राज्य माझे म्हणून नागरिकांनी कर्तव्य पण केली तरच प्रगती आहे. यावेळी प्रमुख अतिथि आमदार महेश दादा लांडगे म्हणाले, या तिन्ही गावांनी मिळून मुसलमानांना जमिनी न देण्याचा जो निर्णय घेतला आहे हा आदर्श त्याचे उदाहरण मी महाराष्ट्राला देईन. आपली प्रॉपर्टी मुसलमानांना विकू नका.ते रुपयाचे दहा रुपये देतील. पण नंतर तुमचे जगणे मुश्किल करतील आणि त्या रुपयाची किंमत दहा पैसे होईल. हैद्राबाद चा ओवेसी दहा मिनिट पोलीस बाजूला हटवा म्हणतो आमची ताकद दाखवू.ही हिम्मत माज हा हिंदूंची एकी नसल्यामुळे येतो. लहानाची मोठी झालेली मुलगी डोळ्यासमोर निघून जाते लव जिहाद धर्म परिवर्तन केल लातुर मध्ये ३५० मुली लग्न आणि नोकरीचे आमिष,कोल्हापूर जिल्ह्यात अनेक मुली बरोबर संबंध ठेवून व्हिडीओ काढून ब्लॅकमेल,नाशिक टीसिएस ची घटना,पुणे मधली घटना,मध्य प्रदेश मध्ये हिंदू वेष धारण करून यवतमाळ मध्ये आदिवासी चे धर्म परिवर्तन,अशा अत्याचाराच्या घटना या जिहादी च्या आहेत.मुंबई मीरा रोड येथे तेरा कोटी चे ड्रुग्स पकडले यातील विकणारे हे मुसलमान होते. पण यातून हिंदू सर्वसामान्य कुटुंबातील तरुण तरुणी ना व्यसणाधीन करून कुटुंब संपवायची. ही जिहादी मानसिकता आहे. छत्रपतींनी अठरा प्रगट जाती या हिंदू आहेत हा धर्म सांगितला आहे.हिंदूंनी एकी केली पाहिजे तरच यांना लगाम बसेल.धर्म शिल्लक राहिला तरच आपण सुरक्षित राहू आपली पुढची पिढी सुरक्षित राहील.व्यवसाय करताना पण आपल्या धर्मातील लोकाना प्राधान्य द्या.कारण जिहादी यातील पैसा हा आपल्या विरोधातच करत असतात.सर्वधर्म समभाव वाल्या पासून सावध रहा. हे आपल्याच धर्माविरोधात असतात.पारंपरिक राजकारणी देखील राजकारण आणि स्वार्थ जपत असल्याने धर्माचे कार्य होत नाही.छत्रपती शिवाजी आणि संभाजी राजांचा आदर्श जीवनामध्ये ठेवून धर्माचे कार्य करा. यावेळी त्यांनी कीर्तनकार सायली ताई महाराज गावडे यांच्या बद्दल गौरव उदगार काढले. यावेळी आमदार लांडगे,डॉ.दिघे,सायलीताई यांचा सत्कार व श्रीराम मूर्ती भेट देण्यात आली.प्रस्ताविक भरत गावडे आभार प्रदर्शन लक्ष्मण गावडे यांनी केले.

You cannot copy content of this page