सावंतवाडी पंचायत समितीचा कारभार रामभरोसे; गुरुदास गवंडे..
⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी पंचायत समितीला वालीच कोण नाही पंचायत समितीचा कारभार रामभरोसे चालू आहे सावंतवाडी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तपासणी करता सातारा येथे गेले असून आठ दिवस पंचायत समितीला वालीच कोणी नाही. सावंतवाडी प्रभारी गटविकास अधिकारी यांना विचारले असता आपण १८ मे ला हजर होणार. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा प्रशासन आवारातील गाड्यांच्या हवा सोडवण्यापेक्षा प्रशासनातील ढिसाळ कारभारावर लक्ष घाला कारण सावंतवाडी पंचायत समितीमध्ये रामभरोसे कारभार चालू आहे कारण इथे दोन विस्तार अधिकारी पद असताना इकडचा एक विस्तार अधिकारी सुजित येरवळकर हा २३/०५/२०२२ रोजी उसनवारीने तीन वर्षाकरिता पंचायत समिती कोरेगाव जिल्हा सातारा येथे १४/०६/२०२३ ला सावंतवाडी येथून बदली झालेले आहेत असे असताना त्यांची प्रशासकीय हजेरी मात्र सावंतवाडीतून लागते हा अजब कारभार सावंतवाडी पंचायत समितीचा तालुक्यामध्ये ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहेत . पैसे देऊन आयुक्त बदल्या केलेल्या आहेत त्यामुळे अशा या कारभारावर लक्ष ठेवण्याऐवजी मुख्य कार्यकारी अधिकारी हे हवा सोडण्यात मग्न आहेत त्यांच्या या अशा वागण्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केलेले आहेत त्यामुळे अगोदर आपला प्रशासनाचा कारभार व्यवस्थित चालवा आणि नंतर बाहेरचे बघा असा प्रतिसवाल सरपंच सेवा संघाचे सावंतवाडी माजी तालुकाअध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केलाय बघितलं गेलं तर प्रशासनामध्ये अनेक पद रिक्त आहेत लोकांवर दबाव टाकून प्रधानमंत्री घरकुल योजनेची घरे पूर्ण करण्यात आली परंतु अजून पर्यंत लाभार्थ्यांना त्यांचे पैसे मिळत नाही शासनाकडे निधी नाही तर मग लाभार्थ्यांवर का दबाव टाकता त्यामुळे अगोदर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी आपल्या प्रशासन कारभार सुधारावा असे श्री गवंडे यांनी आपल्या प्रसिद्ध पत्रकारत म्हटले आहे
