मडुऱ्यात तिलारी पोटकालव्याच्या अर्धवट कामांमुळे शेतकर्यांचे नुकसान
भरपाई न दिल्यास प्रखर आंदोलन छेडण्याचा यशवंत माधव यांचा इशारा *⚡बांदा ता.०७-: मडुरा गावात तिलारी पोट कालव्यासाठी भातशेती क्षेत्रात खोदाई करुन अर्धवट स्थितीत कामे आहेत. खोदाई केलेली माती पावसाळ्यात अन्य क्षेत्रात घुसल्याने शेतकर्यांचे बेसुमार नुकसान झाले आहे. तिलारी कालवा कार्यकारी अभियंता राहुल कोरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी करावी व संबंधित शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी…
