*⚡कणकवली ता.०७-: अनभवानी विविध कार्यकारी सोसायटी डांमरे, तिवरेच्या चेअरमनपदी रविंद्र उर्फ भाई आंबेलकर व उपाध्यक्षपदी तुकाराम दत्ताराम आंबेरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भाई आंबेरकर यांची चेअनमनपदी फेरनिवड झाली आहे. गेली सात वर्षे त्यांनी चेअरमनपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती.
येत्या काळात सोसायटीच्या माध्यमातून शेतकर्यांच्या हितासाठीचे काम केले जाणार आहे असे भाई आंबेलकर यांनी सांगितले. डामरे गावचे माजी सरपंच तथा भाजपा प्रसिद्धीप्रमुख बबलु सावंत यांच्याहस्ते नुतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन करण्यात आले.सोसायटी संचालकपदी उमेश शेलार, सखाराम गोसावी, धोंडू चव्हाण, महेंद्र आंबेलकर, सुभाष गुरव, राजाराम गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. डामरे सरपंच सौ. जाधव, ग्रामपंचायत सदस्य सागर साटम, विजय सावंत आदी उपस्थित होते. माजी सरपंच रघुनाथ चव्हाण, विकास गुरव, अमित वाळवे, दीपक सावंत, संतोष साटम, दादा पांगे, संतोष वाळवे, निवडणूक अधिकारी श्री. साळगावकर, सोसायटी सचिव श्री. देऊळकर आदी उपस्थित होते.
