कणकवली 7 जानेवारी (प्रतिनिधी)- कणकवली पिळणकर वाडी येथील रहिवासी दिनेश शंकर पिळणकर ( वय 45) यांचे निधन झाले.गुरुवारी संध्याकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
कणकवली पिळणकर वाडीतील भजन मंडळातील सुप्रसिद्ध भजनी बुवा म्हणून ते परिचित होते.मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मित्र परिवार देखील मोठा होता.त्यांच्या पश्चात आई,बहीण,काका,काकीअसा परिवार आहे.त्यांच्यावर निम्मेवाडी येथील स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात आले.
