जादूटोणा विरोधी कायद्याबाबत प्रात्यक्षिकांसह व्याख्यान संपन्न

*⚡मालवण ता.०७-:* अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्ग मधील विविध ठिकाणी जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. जादूटोणा विरोधी कायदाअंतर्गत येणाऱ्या बारा कलमांचे सविस्तर मार्गदर्शन व त्यावर आधारित छोटे छोटे प्रयोग व प्रात्यक्षिके दाखवून या कार्यक्रमाद्वारे अंधश्रद्धां व जादूटोणा विरोधात जनजागृती करण्यात आली. समाजातल्या अंधश्रद्धा प्रबोधनाद्वारे दूर करणे, वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणे या हेतूने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा सिंधुदुर्गचे जिल्हा सरचिटणीस विजय चौकेकर जिल्हा संघटक समीर साळकर यांनी या व्याख्यानाचे आयोजन केले होते. यामध्ये समितीचे राज्यउपाध्यक्ष रविंद्र खानविलकर व जिल्हा संपर्कप्रमुख सचिन हिंदळेकर यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंजुमन इस्लाम उर्दू शाळा हरकूळ बूद्रुक कणकवली, वराडकर हायस्कूल आणि जुनिअर कॉलेज कट्टा. भ.ता.चव्हाण विद्यालय चौके, काळसे हायस्कूल आणि जुनिअर कॉलेज काळसे, जि.प.शाळा चौके नं. १, समाजमंदिर चौके आदी ठिकाणी जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान संपन्न झाले. यावेळी अंजुमन इस्लाम उर्दू शाळा हरकूळ बूदूक कणकवली, शाळेचे मुख्याध्यापक नसरीन डांगे, वराडकर हायस्कूल आणि जुनिअर कॉलेज कट्टा शाळेचे प्राचार्य कांबळी, चौकेचे मुख्याध्यापक गावकर, काळसे हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य वालावलकर, जि.प.शाळा चौके नं.च्या मुख्याध्यापिका जाधव, समाजमंदिर चौके येथे दुलाजी चौकेकर बुधाजी चौकेकर कृष्णा चौकेकर मनोज चौकेकर, यावेळी अभाआनिसचे संतोष तांबे, समीर साळकर, जयराम डांबरे, संजय खोटलेकर तसेच सर्व शाळांमधील सहकारी शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. यावेळी लिंबातून टाचण्या, चिंध्या, रक्त काढणे, नारळातून विविध रंगाच्या चिंध्या, फुले काढणे, पाण्याने दिवा पेटविणे, मंत्राने अग्नी प्रज्वलित करणे, पेटता कापूर खाणे, जिभेतून आरपार त्रिशूल काढणे, मंत्राने भूत उतरविणे, अगरबत्तीच्या सहाय्याने करणी भानामती ओळखणे, विभूतीतून रक्त निर्माण करणे आदी प्रात्यक्षिकांसह व्याख्यान देण्यात आले. उपस्थित मुलांकडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आली. यावेळी रवींद्र खानविलकर, सचिन हिंदळेकर, विजय चौकेकर यांनीही प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

You cannot copy content of this page