*⚡बांदा ता.०७-: बांदा-ओंकारनगर येथे बागायतीत काम करताना कामगार संतोष पांडुरंग बांदेकर (वय ३९, रा. बांदा) या युवकाला सर्पदंश झाला. त्याला तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना आज सकाळी घडली.
संतोष हा नेहमीप्रमाणे आज सकाळी बागायतीत सफसफाईचे काम करत होता. त्याच्या पायाला सापाने दंश केला. त्याने याची कल्पना सोबतच्या कामगारांना दिली. त्याला तात्काळ बांद्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन यांनी प्राथमिक उपचार केलेत. अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे पाठविण्यात आले.
