मनसे परिवहन जिल्हाध्यक्ष अँड राजू कासकर यांचे मुख्याधिकाऱ्याना आवाहन..
*⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनधिकृत असलेल्या परप्रांतीयांवर कारवाई करायचे सोडून, स्थानिक गरीब व्यापाऱ्यांवर कारवाई करत असल्याचा आरोप मनसे परिवहन जिल्हाध्यक्ष अँड राजू कासकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
यावेळी ते पुढे म्हणाले की, सावंतवाडीचे मुख्याधिकारी आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन कारवाई करत आहेत. आज सावंतवाडी शहरात अनेक ठिकाणी अस्वच्छता असून, अनेक समस्या आहेत. त्या समस्या दूर करायचा सोडून ते कारवाई करत असल्याचे ते म्हणाले. मुख्याधिकारी यांना जर शहरातील समस्या माहित नसतील तर त्यांनी आमच्या सोबत यावे असे आवाहन अँड राजू कासकर यांनी केले आहे.
यावेळी ते म्हणाले की, गरिबांच्या व्यवसायावर कारवाई करण्यापेक्षा शहरात असलेले अनधिकृत इमारती पाडा. बंद असलेले प्रकल्प सुरू करा असे आवाहन केले आहे. यावेळी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
