जिल्हा न्यायालयात उद्या कंटयुनियर लीगल एज्युकेश कार्यक्रम

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचे आयोजन;उच्च न्यायालयाचे विशेष वकील उज्वल निकम, उच्य न्यायालय न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे, प्रकाश नाईक यांची उपस्थिती

सिंधुदुर्गनगरी ता ०७ बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र -गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ८ जानेवारी रोजी सिंधुदुर्गनगरी येथे कंट्यूनीयर लीगल एज्युकेशन प्रोग्राम (CLEP)चे आयोजन करण्यात आले आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई ८ जानेवारी २०२१ रोजी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँन्ड गोवा यांनी आयोजित केलेल्या एका मार्गदर्शन कार्यक्रमात सहभागी होत आहेत. बार काॅन्सीलने जिल्हातील नवोदीत वकीलांसाठी मार्गदर्शन तसेच कोल्हापूर खंडपीठाचे प्रयत्न या दृष्टीने होणारा हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. दोन सत्रात चालणार्‍या या कार्यक्रमात उच्च न्यायालयाचे विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम याचे मार्गदर्शनही महत्त्वाचे असून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नगिरी, गोवा कोल्हापूर, सांगली सातारा या भागातील न्यायाधीश, वकीलवर्ग हेही उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्ग वकिलानी या कार्यक्रमासाठी मोठ्या संखेने उपस्थीत रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने ८ जाने रोजी शरद कृषी भवन सिंधूदुर्गनगरी येथे स.९ ते सायं ५ या वेळेत नवोदित वकील तसेच कार्यरत वकिलांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व जिल्ह्य़ाचे पालक न्यायमूर्ती प्रकाश नाईक सिंधुदुर्गचे सुपुत्र व उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे हे उपस्थित राहणार आहेत व मार्गदर्शन करणार आहेत. दुपारनंतरच्या सत्रात प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ व पद्मश्री अँड उज्ज्वल निकम यांचे नवोदित वकिलांसाठी होणारे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. २६/११ चा खटला तसेच अनेक खटल्यांबाबत त्यांचे अनुभव व मार्गदर्शक या चर्चासत्रात होणार आहे.

उच्च न्यायालयाच्या दुसरे कायदेतज्ज्ञ अँड शेखर नाफडे यांचे कायद्यातील तरतुदी बाबतचे मार्गदर्शन व तिसरे मार्गदर्शक उच्च न्यायालयाचे अँड अरविंद आवाड यांचेही “अँडव्होकेट आँन रेकाॅर्ड” याबाबतच मार्गदर्शन होणार आहे. नवोदीत वकील आणि जिल्हा पातळीवर काम करणार्‍या वकील वर्गासाठी उच्च न्यायालय अथवा सर्वोच्च न्यायालयात काम करण्यासाठी जी पात्रता लागते त्यासाठी काय तयारी करावी लागते याचेही मार्गदर्शन या चर्चासत्रात होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील ७ ज्येष्ठ नामांकित वकीलांचा सत्कार होणार आहे. यामध्ये अँड दिलीप वसंत नार्वेकर,अँड प्रकाश शंकर रानडे,अँड सुभाष गोपाळ पंदुरकर, अँड विलास राधाकृष्ण पांगम,अँड प्रकाश देवराव परब, अँड अजित पांडुरंग गोगटे, अँड श्रीकृष्ण ऊर्फ अजित नारायण भणगे यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती अँड सग्राम देसाई यांनी दिली.

You cannot copy content of this page