प्रभाग ४ च्या विकासासाठी कटिबद्ध-:सौ. पूनम चव्हाण यांचा विश्वास…

⚡मालवण ता.२८-: ओसरगाव येथील सिंधुदुर्ग भवन प्रमाणे मालवणात उद्योग भवन उभारले गेल्यास इथल्या बेरोजगारांना रोजगार मिळेल याहेतूने कुंभारमाठ येथे माझ्या मालकीची जी जमीन आहे, ती जमीन उद्योग भवनासाठी विनामोबदला देण्यास मी तयार आहे जेणे करून मालवण तालुक्यातील बेरोजगार तरुण तरुणी रोजगारासाठी मालवण सोडून जाणार नाहीत. या जागेत मालवण तालुक्याचे उद्योगभवन होण्यासाठी आपण शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता…

Read More

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी करार शासनाचा…

लखमराजे भोसले:मोती तलावात हॉटेल प्रस्ताव कोणी आणला होता..? ⚡सावंतवाडी ता.२८-: मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलबाबतचा सामंजस्य करार हा शासनाकडून करण्यात आला होता आमच्याकडून नाही. त्यामुळे त्यात आम्ही अटी शर्ती घालण्याचा प्रश्नच येत नाही.त्या करारावर आम्ही एकदा नाही तर दोन वेळा सह्या केल्या आहेत. उर्वरित सही घेण्याची जबाबदारी ही शासनाची आहे. त्यासाठी दोन एकर जागा आम्ही मोफत दिली आहे….

Read More

“शिवसेनेला संधी द्या, बदल हमखास…

आमदार महेश सावंतांचा विश्वास:सावंतवाडीत ठाकरे गटाची प्रचार रॅली उत्साहात.. ⚡ सावंतवाडी ता.२८-:नगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येत असताना सावंतवाडीत ठाकरे शिवसेनेचा प्रचार जोरात सुरू आहे. शहरातील विविध भागातून काढण्यात येणाऱ्या प्रचार रॅलींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शिवसैनिकांनी शहराला भगवामय करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या रॅलीत दादर-माहीम मतदारसंघाचे आमदार महेश सावंत यांनी सहभाग घेतला….

Read More

प्रभाग सातमध्ये परिवर्तनाची घोषणा; हुले–गावकर यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.२८-: मालवण शहरातील प्रभाग सात मध्ये बाजारपेठ व मेढा असे महत्वाचे परिसर असून आजही या प्रभागातील मूलभूत सोयी सुविधांबाबतच्या समस्या सुटलेल्या नाही. या प्रभागातून गेली तीस वर्षे सतत पक्ष बदलून लोकप्रतिनिधी राहिलेल्या मंडळींनी फक्त आपला विकास साधण्याचे काम केले आहे. त्यामुळे या प्रभागात परिवर्तन घडविण्याच्या दृष्टीने नगरपालिका निवडणुकीत आमदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण…

Read More

ज्युबली कप 2025 च्या उद्घाटन सोहळ्याचे दिमाखदार आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२८-: मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी या प्रशालेमध्ये ज्युबली कप 2025 च्या अनुषंगाने आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आले. या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यातून खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांना प्रशालेचे मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालदाना यांच्या शुभहस्ते शाल, सन्मानचिन्ह व प्रेमाचे प्रतीक…

Read More

वरची कुंभरवाडी येथील कचरा हटवला…

नगरसेवक मंदार शिरसाठ यांचा पुढाकार.. कुडाळ : कुडाळ नगर पंचायत हद्दीतील वरची कुंभारवाडी येथे रेल्वे रोडवर बरेच दिवस कचऱ्याचे ढीग जमा झाले होते. नागरिकांच्या विनंतीवरून नगरसेवक मंदार शिरसाठ यांनी तो कचरा हटविण्यात पुढाकार घेतला.त्या संदर्भात वरची कुंभारवाडी, पाण्याच्या टॉकीजवळ साठलेल्या कचऱ्याचा येथील नागरिकांना होतं असलेल्या त्रासाबद्दल सुरेंद्र तेली यांनी याबद्दल तात्काळ कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक मंदार…

Read More

शिंदेंचा सिंधुदुर्गात धडाका; मालवण-वेंगुर्ला-सावंतवाडी येथे ३० रोजी जाहीर सभा…

⚡मालवण ता.२८-: मालवण सावंतवाडी वेंगुर्ला नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे दि ३०. नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून मालवण–वेगुर्ले–सावंतवाडी येथे प्रचार सभा होणार असल्याची माहिती मालवणचे आमदार निलेश राणे यांनी दिली शिंदे यांच्या दौऱ्याची सुरुवात मालवण येथील प्रचार सभेने संध्याकाळी ४ वाजता होणार आहे. त्यानंतर वेगुर्ला येथे…

Read More

मालवणच्या विकासाचा अष्टसूत्री संकल्प या व्हिजन डॉक्युमेंटचे आमदार निलेश राणे यांच्याकडून सादरीकरण…

⚡मालवण ता.२८-: चार दिवसापूर्वी मालवणचे आमदार निलेश राणे यांनी मालवणच्या शिवसेना मेळाव्यात जाहीर केल्याप्रमाणे काल रात्री मालवणातील नागरिकांच्या बैठकीत विकासाचे रोल मॉडेल सादर करताना आमदार राणे यांनी शहर विकासाचा अष्टसूत्री संकल्प जाहीर केला यामध्ये मालवणातील ऐतिहासिक पर्यटन आणि वारसा जतन, मालवण मरीन ड्राईव्ह आणि आधुनिक शहर संकल्पना, पायाभूत सुविधा व जलव्यवस्थापन, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन,…

Read More

गोवा येथील दोन एल.ई.डी. नौकांवर मालवण किनारपट्टीवर कारवाई…

⚡मालवण ता.२८-:गोवा येथील दोन एल.ई.डी. नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने मालवण किनारपट्टीवर कारवाई केली असून मत्स्य व्यवसाय विभागाने या दोन्ही नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवल्या आहेत. तर नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. गुरुवार २७ रोजी रात्री ९ ते १० च्या दरम्याने देवबाग, मालवण समोर मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी श्री….

Read More

प्रभाग हेच माझे कुटुंब; विकासासाठी सदैव उपलब्ध-: तपस्वी मयेकर…

⚡मालवण ता.२८-: माझ्या प्रभागातील लोकांसाठी मी सदैव उपलब्ध असतो, सर्वांच्या सुख दुःखात सहभागी असतो. माझा प्रभाग हे माझेच कुटुंब मानून प्रभागाच्या विकासासाठी, समस्या सोडविण्यासाठी मी आजपर्यंत काम केले आहे. प्रभागातील प्रत्येक व्यक्तीकडे माझा मोबाईल नंबर आहे. घराघरात माझा चेहरा आणि काम पोहचले आहे. माझी ही धडपड आज जनतेचा आशीर्वाद बनून पुढे येत असून प्रभाग दहा…

Read More
You cannot copy content of this page