धाकोरे येथील श्रमदानातून परिसर स्वच्छता मोहिमेस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.०५-: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्वच्छता आणि आरोग्य अबाधित राखण्याच्या उद्देशाने, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली धाकोरे ग्रामपंचायत हद्दीत ४ जून रोजी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात, सार्वजनिक ठिकाणी,मंदिर,शाळा,कार्यालय परिसर अशा विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेत व्यापक साफसफाई करण्यात आली.
​या मोहिमेत गावाचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत श्री पावणादेवी मंदिर परिसर, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालय परिसराची पूर्णपणे स्वच्छता करून परिसर स्वच्छ करून कचरा एकत्रित गोळा करण्यात आला.
​”ग्रामीण भागातील आरोग्य सुदृढ राहावे यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. धाकोरेवासियांनी दाखवलेली ही एकजूट कौतुकास्पद आहे.​या उपक्रमात धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक सह ,ग्रामपंचायत अधिकारी ,सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वर्ग ,अंगणवाडी सेविका,मदतनीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. लोकसहभागातून यशस्वी झालेल्या या स्वच्छता मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page