सावंतवाडीच्या विकासासाठी आमदार प्रमोद जठार यांनी दिली पालिकेला भेट…

नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांच्याकडून स्वागत; विकासकामांसाठी निधीचे दिले आश्वासन..

⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रमोद जठार यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून आज त्यांनी सावंतवाडी नगरपालिकेला विशेष भेट दिली.

यावेळी नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केले.
या भेटीदरम्यान शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. शहराच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले सहकार्य आणि निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार जठार यांनी दिले. “सावंतवाडीच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असून शहरातील नागरिकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नगरपालिकेतील बैठकीत शहरातील मूलभूत सुविधा, प्रलंबित विकासकामे तसेच भविष्यातील विकास आराखड्यांवर चर्चा करण्यात आली. विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही आमदार जठार यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नगराध्यक्षा श्रद्धाताई भोसले, महिला मोर्चा अध्यक्षा श्वेताताई कोरगावकर, मंडल अध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधीर आरिवडेकर, उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, रणजीत देसाई, नियोजन सभापती आनंद नेवगी, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page