कणेडी-कुपवाडे-शिवापूर-शिरशिंगे-सांगेली-दणोली-बांदा रस्त्याच्या डागडुजीचे काम प्रगतीपथावर…

सरमळे परिसरातील संरक्षक भिंत व रेलिंगचे कामही १५ ते २० दिवसांत पूर्ण होणार; सार्वजनिक बांधकाम विभागाचे काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांना पत्र..

⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी तालुक्यातील कणेडी-कुपवाडे-शिवापूर-शिरशिंगे-सांगेली-दणोली-बांदा कि.मी. १५/६०० ते २२२/८०० या राज्य मार्ग क्रमांक १९० वरील रस्त्याच्या डागडुजी व सुधारणा कामाला गती देण्यात आली असून हे काम सध्या प्रगतीपथावर असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.याबाबत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांनी सावंतवाडी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय मालवणकर यांना पत्राद्वारे माहिती दिली.

दरम्यान संबंधित रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा काम सुरू असून सरमळे येथील सप्तनाथ मंदिर परिसरातील रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
तसेच, या ठिकाणी नदीकाठालगत सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेली रेलिंग व गॅबियन वॉल उभारण्याचे काम पुढील १५ ते २० दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. सरमळे पूल ते विलवडे या मार्गाचीही सविस्तर पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलेल्या बाबींची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून संबंधित कामे नियोजित कालावधीत पूर्ण करण्यासाठी विभाग प्रयत्नशील असल्याचेही सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच प्रस्तावित आंदोलन किंवा अन्य आंदोलनात्मक कार्यक्रम स्थगित ठेवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे..

You cannot copy content of this page