कणकवलीत दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू…

कणकवली : कणकवली शहरात नगरपंचायतीच्या माध्यमातून काल गुरुवारी अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली होती. यात काही बंद असलेले स्टॉल हटविण्यात आले होते. तर उर्वरित स्टॉल आणि अनधिकृत बांधकाम केलेल्यांना स्वतःहून बांधकामे हटविण्याचे निर्देश कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिले होते. जर स्वतःहून अतिक्रमणे हटवली नाहीत तर नगरपंचायतीच्या माध्यमातून ती हटवली जाईल असा इशारा पाटील यांनी दिला होता. त्यानंतर आज दुपारी साडेअकरा वाजल्यापासून पुन्हा एकदा स्टॉल हटाव मोहिमेला प्रारंभ झाला आहे. यात मुख्याधिकारी गौरी पाटील स्वतः फिल्डवर उतरल्या आहेत. दरम्यान शहरातील स्टॉल धारकांनी कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेऊन स्टॉल हटविण्यासाठी काही दिवसांची मुदत देण्याची मागणी केली होती. मात्र नगरपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असल्याने त्यात हस्तक्षेप करता येणार नसल्याचे नगराध्यक्ष श्री पारकर यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page