जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावंतवाडी भाजपा जनसंपर्क कार्यालयात विशाल परब यांच्या हस्ते वृक्षारोपण…

⚡सावंतवाडी ता.०५-: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या अभियानांतर्गत सावंतवाडी भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे “एक पेड माँ के नाम” हा विशेष उपक्रम उत्साहात पार पडला. महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

“आईच्या नावाने एक झाड, पर्यावरणासाठी मोठे योगदान” या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमात विशालजी परब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, सावंतवाडी मंडल युवा अध्यक्ष हितेन नाईक, मंडल चिटणीस धीरेंद्र म्हापसेकर, शक्ती केंद्रप्रमुख गोविंद साटेलकर, सुदेश नेवगी, पंकज तळसुलकर, अभिजीत धुरी, विनेश तावडे, ओंकार पावसकर, साईप्रसाद भोई, श्रीकांत राज्याध्यक्ष आदी उपस्थित होते.
उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला.

You cannot copy content of this page