खवल्या मांजराचे खवले व सांबर शिंगे प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर…

⚡कणकवली ता.०४-: खवल्या मांजराचे खवले व सांबराचे शिंगे बाळगल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपी गणेश प्रदीप शिंदे (रा. पडवे, ता. कुडाळ) याला सावंतवाडी येथील न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील विविध कलमानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २९ मे रोजी राम वागुंडी – जानवली मार्गावर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून खवल्या मांजराचे खवले व सांबराचे शिंगे जप्त करण्यात आले.

अटकेनंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यानंतर आरोपीतर्फे जामीन अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जावरील सुनावणीनंतर मुख्य न्याय दंडाधिकारी, सावंतवाडी यांनी ३ जून रोजी दिलेल्या आदेशानुसार आरोपीला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. या प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. अशफाक शेख यांनी काम पाहिले असून अॅड. पंकज खरवडे यांनी सहकार्य केले.

You cannot copy content of this page