Headlines

पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर सावंतवाडी एसटी डेपोतील खड्डे तत्काळ बुजवले,प्रवाशांमधून समाधान

⚡​सावंतवाडी ता.२६-:सावंतवाडी येथील एसटी बस स्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना आणि नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते. विशेषतः पावसाच्या दिवसांत या खड्ड्यांमध्ये पाण्याचे डबके साचून चिखल होत होता. एसटी बस स्थानकात येताना किंवा तिथून बाहेर पडताना आजूबाजूने जाणाऱ्या गाड्यांमुळे खड्ड्यातील साचलेले दूषित पाणी…

Read More

महाराष्ट्रातील मच्छीमारांना डिझेल दरात सवलतीसाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची दिल्लीत भेट…

खासदार नारायण राणे, राज्याचे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे, आम.निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने गेली भेट:राज्यातील मच्छीमारांना दिलासा मिळवून देण्याचा मंत्री नितेश राणे यांचा प्रयत्न.. नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या ज्वलंत प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारकडे निर्णायक पाठपुरावा सुरू झाला आहे. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांची नवी…

Read More

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सिंधुदुर्गातील युवकांना पंतप्रधान मोदींशी संवादाची संधी

कणकवलीतील एस.एस.पी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात व्हर्च्युअल संवादाचे आयोजन:देशभरातील १६०० ठिकाणांहून ८ लाख युवकांचा सहभाग.. कणकवली : राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना आणि युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संवाद साधण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. ‘माय भारत’ (MY Bharat) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभासी संवाद कार्यक्रम…

Read More

श्रावण मेळ्यात भक्तीगीतांची सुरेल मैफिल…

भजनी व दशावतारी कलावंतांचा सन्मान:लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाचा उपक्रम;गणेश भक्तांना पूजा साहित्य वाटप व स्वच्छता मोहिमेचे आयोजन.. ⚡कणकवली ता.२६- : तालुक्यातील हळवल परबवाडी येथील लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून श्रावण मासाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत श्रावण मेळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुरेल भावगीते व भक्तिगीतांची संगीत संध्या रंगली….

Read More

समस्या सोडविण्यासाठी जनता दरबार घेणार

सभापती हर्षदा वाळके, उपसभापती राजेश सावंत यांची माहिती कणकवली : तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम, महामार्ग प्राधिकरण, महावितरण, एसटी यांसह विविध विभागांशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार जनता दरबार घेण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती हर्षदा वाळके व उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी, सार्वजनिक बांधकाम…

Read More

‘श्रमातून आनंद’ उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाचे संस्कार..

चौकुळ जि. प. केंद्र प्राथमिक शाळेत विशेष राखी निर्मिती व ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रम.. ⚡आंबोली ता.२६-: श्रमातून कौशल्य, कौशल्यातून स्वावलंबन आणि स्वावलंबनातून आनंद या ब्रीदवाक्याने जि. प. केंद्र प्राथमिक शाळा चौकुळ नं. १ येथे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, सर्जनशीलता, श्रमप्रतिष्ठा आणि देशप्रेमाची मूल्ये रुजविण्याच्या उद्देशाने ‘श्रमातून आनंद’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने…

Read More

वैभव राऊळ यांची कोकण आघाडी अध्यक्षपदी फेरनिवड…

वडगावशेरी विधानसभा लोहगाव-धानोरी मंडळात भाजपकडून पुन्हा विश्वास; कार्यकर्त्यांकडून अभिनंदन.. ⚡सावंतवाडी ता.२६-: भारतीय जनता पार्टी वडगावशेरी विधानसभा लोहगाव-धानोरी मंडळाच्या कोकण आघाडी अध्यक्षपदी वैभव वसंत राऊळ यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते राऊळ यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी भाजप लोहगाव मंडळ अध्यक्ष संदीप…

Read More

निरुखेतील २०० ग्रामस्थांना मोफत एनसीएमसी कार्डचे वाटप

गावांचा सर्वांगीण विकास हेच शिवसेनेचे ध्येय : दत्ता सामंत कुडाळ : निरुखे-पांग्रड परिसरातील मूलभूत प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चितपणे सोडविले जातील. प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हेच शिवसेनेचे ध्येय असून, ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता सामंत यांनी…

Read More

रेडी ग्रामपंचायत राबवतेय विविध सामाजिक उपक्रम….

वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील रेडी ग्रामपंचायत कडून15 वा वित्त आयोग अंतर्गतगावातील गरजू महिलांना ग्रामपंचायत कडून मोफत घरघंटी देण्यात आली.यावेळीगावातील 10 वी 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच घरदुरुस्तीसाठी मदत म्हणून संबंधिताना धनादेश देण्यात आला. जि.प. शाळेत आपली मुले दाखल करण्याचे आवाहन ग्रामपंचायत कडून करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मराठी शाळेत आपली मुले दाखल करणाऱ्या…

Read More

सावंतवाडी एसटी बसस्थानकाचे काम तातडीने सुरू करा…

गणेशोत्सवापूर्वी १५ नवीन बसेस; बेळगावमार्गे बंगळुरू आंतरराज्य बससेवा सुरू करण्याची केसरकरांची मागणी ⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी मतदारसंघातील एसटी सेवेच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. यावेळी सावंतवाडी एसटी बसस्थानकाचे रखडलेले बांधकाम तातडीने सुरू करणे, गणेशोत्सवापूर्वी उर्वरित १५ नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देणे तसेच सावंतवाडी-बेळगावमार्गे बंगळुरू…

Read More
You cannot copy content of this page