Headlines

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे विकास कामांसाठी वेंगुर्ला राष्ट्रवादीकडून निधीची मागणी

वेंगुर्ला ता.२६-:* वेंगुर्ला नगरपरीषद क्षेत्रातील रस्त्यांच्या कामांसह शहरातील पर्यटन पुरक महत्वपूर्ण विकास कामे व उपजिल्हा रूग्णालयासाठी रूग्णालयाच्या संरचनेप्रमाणे अत्यावश्यक ते डॉक्टर व स्टॉफ देण्याची मागणी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे त्याच्या दालनांत प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची २३ एप्रिल…

Read More

आश्वासनानंतर वेतोरेतील आंदोलन स्थगित

वेंगुर्ला ता.२६-:* कुडाळ दाभोलीमार्गे वेंगुर्ला रस्त्यावरील वेतोरे-खांबडवाडी येथील पुलाच्या अर्धवट कामाबाबत तसेच अपूर्ण डांबरीकरणाबाबत सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना वारंवार निवेदने देऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने संतत्प झालेल्या वेतोरे-वरचीवाडी, खानोली, दाभोली, वायंगणी गावातील ग्रामस्थांनी २५ एप्रिल रोजी सातेरी मंदिर येथे रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वेंगुर्ला उपविभागीय अभियंता भगत…

Read More

अनिल राणे यांना आदर्श सामाजिक नेतृत्व कार्यभूषण पुरस्कार प्रदान

सावंतवाडी ता.२६-:* दोडामार्ग येथील श्री महागणपती सिद्धिविनायक देवस्थान व कै.श्री.पांडुरंग गोविंद गवस प्रतिष्ठान तथा सेवाभावी संस्था मांगेली-तळेवाडी, दोडामार्गच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे यांना ‘आदर्श सामाजिक नेतृत्व कार्यभूषण पुरस्कार-२०२२’ देऊन सन्मानित करण्यात आले. मांगेली येथे श्री महागणपती सिद्धिविनायक देवस्थानच्या सहाव्या वर्धापन दिनी आयोजित शानदार…

Read More

माणगाव वासियानी केलेला सत्कार जीवनात कधीच विसरणार नाही …

विशाल परब यांनी काढले भावनिक उद्गार… कुडाळ ता.२६-:* हिंद मराठा संघ(रजि)च्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर माणगाव मध्ये माझा पहिला सत्कार होतोय.हा सत्कार मी कधीही विसरू शकणार नाही.निश्चितच माझ्या या कार्याची दखल घेवून मला हे महत्वाचे पद मिळाल्यानंतर माझ्या माणगावकर यातच माझा पहिला हृदय सत्कार मराठा बांधवांच्या वतीने होतोय हे मी जीवनात कधीही विसरू शकणार…

Read More

मालवण तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रावण नंबर १ शाळेचे घवघवीत यश

कणकवली ता.२६-:* महाराष्ट्र शासन अंतर्गत समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व शिक्षण विभाग पंचायत समिती मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता पहिली ते आठवी या गटामध्ये महात्मा गांधी विद्यालय शाळा श्रावण नंबर 1 या शाळेची विद्यार्थिनी कुमारी रेवती सूनील लाड हिने द्वितीय…

Read More

कणकवली शहरातील नागरिकांची वाहतूक झाली आणखी सुलभ

अजून एक डीपी रस्ता जनतेच्या सेवेत नवीन रस्ते करण्याच्या कामाचा धडाका कणकवली ता.२६-:* कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या नगरपंचायतमधील सत्ताधारी टीम मार्फत कणकवली शहरातील नवनवीन रस्ते विकसित करण्यावर प्रामुख्याने भर देण्यात आला. कणकवली शहरातील यापूर्वी अनेक रस्ते डीपी प्लान मध्ये होते ते प्रत्यक्षात कार्यान्वित केल्या नंतर आता कणकवली शहरात अजून एक…

Read More

कणकवली येथे 1 मे रोजी रस्ता-सुरक्षा मोटरसायकल फेरी

कणकवली ता.२६-:* भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना ब्रह्माकुमारीज(माऊंट अबू-राजस्थान) परिवहन विभाग, कणकवली तालुका प्रवासी संघटना, आणि आम्ही कणकवलीकर यांच्या सहभागातून १ मे २०२२ रोजी महाराष्ट्र-दिन व कामगार-दिन यांचे औचित्य साधत “रस्ता-सुरक्षा मोटर सायकल फेरी”चे आयोजन जनजागृती साठी करण्यात आले आहे. वाहन चालविताना रस्त्यावरील सुरक्षा कशी ठेवावी, सार्वजनिक ठिकाणी वाहने वापरताना काय दक्षता…

Read More

सरपंच, उपसरपंच यांचे मानधन नियमित द्या

अन्यथा आंदोलन;महिला पंचायत फेडरेशनचा निवेदनाद्वारे इशारा ओरोस ता.२६-:सरपंच, उपसरपंच मानधन व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना सदस्य बैठक भत्ता देण्यात अनियमितता दिसून येते. कायद्याने स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकनियुक्त सदस्यांना हा अधिकार मिळाला आहे. तो नियमित देण्यात यावा. यातील अनियमितता दूर न केल्यास महाराष्ट्र राज्याच्या पंचायत महिला फेडरेशनच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आफ्रोजा…

Read More

१९ वर्षाखालील मुलांना जंतनाशक गोळ्या वाटप

२५ एप्रिल पासून मोहिमेला प्रारंभ ओरोस ता.२६-:राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेच्या निमित्ताने २५ एप्रिल ते २९ एप्रिल २०२२ या पाच दिवसांच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत असून वयवर्ष १ ते १९ वयोगटातील सुमारे १ लाख ५० हजार बालकांना जंतनाशक गोळ्या ( अल्बेंडाजोल ) देण्याचे काम चालू करण्यात आले आहे. या मुलांना…

Read More

तंत्रशिक्षण संचालक डॉ अभय वाघ यांनी मालवण तंत्रनिकेतनला भेट देऊन जाणून घेतल्या समस्या…

आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून मंजूर झालेल्या २४ कोटी रुपयांच्या खर्चाची दिली माहिती… *⚡मालवण ता.२५-:* मालवण कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील विविध समस्यांबाबत युवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधल्यानंतर तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ व वरिष्ठ अधिकारी यांनी तंत्रनिकेतनला भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. यावेळी डॉ. वाघ यांनी आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून…

Read More
You cannot copy content of this page