विशाल परब यांनी काढले भावनिक उद्गार…
कुडाळ ता.२६-:* हिंद मराठा संघ(रजि)च्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर माणगाव मध्ये माझा पहिला सत्कार होतोय.हा सत्कार मी कधीही विसरू शकणार नाही.निश्चितच माझ्या या कार्याची दखल घेवून मला हे महत्वाचे पद मिळाल्यानंतर माझ्या माणगावकर यातच माझा पहिला हृदय सत्कार मराठा बांधवांच्या वतीने होतोय हे मी जीवनात कधीही विसरू शकणार नाही. असे भावनिक उदगार विशाल परब यांनी काढले.
हिंद मराठा( रजिस्टर) संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हापदी निवड झाल्यानंतर विशाल परब यांचा भव्य सत्कार माणगाव येथे करण्यात आला. यावेळी सत्कार समारंभात व्यासपीठावरून ते बोलत होते.यावेळेस बोलताना विशाल परब म्हणाले की मी अनेक वर्षे समाज कार्यात अग्रेसर आहे.पण माझ्या कार्याची दखल घेवून मला हे पद दिल गेल त्याला मी योग्य पद्धतीने न्याय देणार आहे.लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर करणार आहे.तर आठही तालुक्याच्या दौरा करणार आहे.
आणी या आठही तालुक्यातील अध्यक्ष निवडून तालुकास्तरीय कार्यकारणी जाहीर करणार आहे.तसेच मराठा समाजाचा जिल्ह्यास्तरीय भव्य दिव्य असा मेळावा मे महिन्याच्या तिसरा आठवड्यात कुडाळात घेणार आहे.यासाठी महाराष्ट्रातील मराठा समाजाचे नेते उपस्थित राहणार आहे.मराठा समाजातील मुलांसाठी व ज्ञाती बांधवांच्या उन्नतीसाठी आप सतत झटत राहणार असल्याचे विशाल परब यांनी यावेळेस सांगितले.यावेळेस सत्कार समारंभात व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विशाल परब,माजी सभापती मोहन सावंत,जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, श्रावण धुरी, उपसरपंच दत्ता कोरगावकर, आदम शहा, योगेश केरकर,दिनेश शिंदे यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
