कणकवली ता.२६-:* महाराष्ट्र शासन अंतर्गत समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व शिक्षण विभाग पंचायत समिती मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता पहिली ते आठवी या गटामध्ये महात्मा गांधी विद्यालय शाळा श्रावण नंबर 1 या शाळेची विद्यार्थिनी कुमारी रेवती सूनील लाड हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या वकृत्व स्पर्धेसाठी विषय होता ‘भारताचे संविधान’. या यशाबद्दल तिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल तिला प्रमाणपत्र आणि तिच्या बँक खात्यात बक्षिसांची रक्कम जमा केली जाणार आहे.
यशस्वी विदयार्थ्यांचा सत्कार करतेवेळी मालवण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय माने, विस्तार अधिकारी अनुक्रमे उदय दिक्षित, सविता परब, केंद्रप्रमुख अनुक्रमे नंदकुमार गोसावी, अन्वर शेख, गौरी नार्वेकर, कुडाळकर हायस्कूलच्या मुख्याध्यापक नंदिनी साटलकर, डीएड कॉलेजचे प्राध्यापक नागेश कदम उपस्थित होते. वकृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून डीएड कॉलेज मालवणचे प्राध्यापक नागेश कदम, प्राध्यापक सुनंदा पोकळे, नाथ पै सेवांगणच्या शिक्षिका ऋतुजा केळकर यांनी काम पाहिले. रेवतीच्या या सातत्यपूर्ण यशाबद्दल श्रावण गावचे सरपंच प्रशांत परब, उपसरपंच प्रमोद घाडी, केंद्रप्रमुख नितीन कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवराम परब, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अजय परब, महात्मा गांधी तंटामुक्त गाव कमिटीचे अध्यक्ष संभाजी परब, ग्रामसेवक व्ही. व्ही. रावले यांनी रेवती आणि सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. रेवती हिला शाळेचे मुख्याध्यापक स्मिता किंजवडेकर, शिक्षक विनायक हरकुळकर, साक्षी कुबल, रागिनी ठाकूर, सचिन घोटाळे यांनी मार्गदर्शन केले आहे. या यशाबद्दल सर्व स्तरावरून रेवती आणि तिच्या पालकांचे कौतुक होत आहे.
