Headlines

बेकायदेशीर बांधकामावरती कारवाई करा

न प सभेत बुवा तारी यांची मागणी देवगड-प्रतिनिधी देवगड-जामसंडे नगरपंचायतीमधील प्रभाग क्रमांक १३ मधील खुल्या क्षेत्रात झालेल्या बेकायदेशीर बांधकामवरती योग्य ती कारवाई करा तसेच अन्य् प्रभागामधील देखील अश्या अन्य अनधिकृत बांधकामावरती कारवाई करा अशी मागणी देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या मासिक सभेमध्ये नगरसेवक निवृत्ती ऊर्फ बुवा तारी यांनी केली. देवगड-जामसंडे नगरपंचायतीची मासिक सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More

देवगडात उद्या “या निमित्त” रक्तदान शिबिराचे आयोजन

गुजराती नवरात्र मंडळ, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान व मेडिकल फाउंडेशनचा पुढाकार देवगड ता.२७-:* देवगड तालुका गुजराती नवरात्र मंडळ व सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान देवगड आणि देवगड मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय प्रकाशभाई भद्रा आणि स्वर्गीय कांतिभाई पटेल यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, मोफत नेत्र तपासणी, व हाडांच्या आजाराची मोफत तपासणी.पाठदुखी,…

Read More

मुणगे देवस्थान अध्यक्षपदी ओंकार पाध्ये

देवगड ता.२७-:* नवसाला पावणाऱ्या व भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती देवालयाच्या श्री भगवती देवस्थान कमिटीच्या अध्यक्षपदी ओंकार पाध्ये,तर उपाध्यक्षपदी दिलीप दिगंबर महाजन, सचिवपदी निशाद परुळेकर यांची निवड झाली आहे. विश्वस्त म्हणून प्रकाश सावंत, आनंद घाडी, पुरुषोत्तम तेली, मनोहर मुणगेकर, अनिल धुवाळी, कृष्णा सावंत, रामचंद्र मुणगेकर, वसंत शेट्ये हे काम पाहणार आहेत….

Read More

राजवाडा ब्राम्हण मंदिरात ३ मे रोजी विविध कार्यक्रम

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला शहरातील राजवाडा येथील श्रीदेव ब्राम्हण देवस्थानमध्ये मंगळवार दि. ३ मे रोजी अक्षयतृतीया निमीत्त प्रतिवर्षीप्रमाणे विविध धार्मिक, विविध स्पर्धात्मक मनोरंजनाचे खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले आहेत. सकाळी धार्मिक विधी, १० वाजता श्री सत्यनाराण महापुजा, दुपारी १२ ते ३ यावेळेत महाप्रसाद, ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत विविध स्पर्धात्मक मनोरंजनाचे खेळ, सायंकाळी ७…

Read More

‘किरात‘च्या खुल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत किशोर वालावलकर प्रथम

*⚡वेंगुर्ला ता.२७-:* वेंगुर्ला येथील साप्ताहिक ‘किरात‘ ट्रस्टने ‘लोकप्रतिनिधींकडून माझ्या अपेक्षा‘ या विषयावर आयोजित केलेल्या खुल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सावंतवाडी येथील किशोर वालावलकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय लोकशाही व्यवस्थेची स्थिती आणि गती समजून घ्यावी या उद्देशाने ही निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेला राज्याच्या विविध भागातून अनेक निबंध लेखककडून भरघोस प्रतिसाद मिळाला….

Read More

अन्यथा अन्याय दूर करण्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल

नवोदय प्रवेश प्रश्नी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी वेधले लक्ष कणकवली ता.२७-:* नवोदय विद्यालय प्रेवश परीक्षा प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्हयातील विद्यार्थ्यावर होत असलेला अन्याय दूर करण्यात यावा.अन्यथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी शिवसेना ,युवा सेना संघटनेला आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना दिला आहे….

Read More

दयानंद कोकाटे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघातर्फे सन्मान कणकवली ता.२७-:* सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने दिला जाणारा या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ न. म. विद्यालय व ज्युनियर कॉलेज व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील सहाय्यक शिक्षक दयानंद बंडू कोकाटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा…

Read More

रामगडावर 1 मे रोजी होणार दीपोत्सव मशाल उत्सव साजरा

कणकवली ता.२७-:* मालवण तालुक्यातील किल्ले रामगड येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी भव्य असा दीपोत्सव आणि मशाल उत्सव साजरा केला जाणार आहे. दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र आणि रामगड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे. दुर्गवीर प्रतिष्ठाने 2015 मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर किल्ले रामगड येथील सुरू केलेल्या संवर्धन कार्यास सात वर्षे पूर्ण होत आहेत…

Read More

आमदार रवींद्र चव्हाण सर्वसामान्य जनतेचे आमदार

कार्यकर्त्यांनी साधला सावंतवाडीत संवाद : मनमोकळेपणाने मारल्या गप्पा *सावंतवाडी ता.२८ प्रसन्न गोंदावळे-:* माजी राज्यमंत्री तथा भाजपा आमदार रवींद्र चव्हाण सध्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून ते आज सावंतवाडी येथे आले असता त्यांनी एका हॉटेलमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसोबत चहाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांच्यासोबत सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब उपस्थित होते. दरम्यान, हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील…

Read More

सावंतवाडीत उद्या इफ्तार पार्टी

राष्ट्रीय काँग्रेसचे आयोजन;महेंद्र सांगेलकर, ऍड राघवेंद्र नार्वेकर यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन सावंतवाडी ता.२६-:* येथील तालुका काँग्रेसच्या वतीने उद्या 27 रोजी सायंकाळी ६:३० वाजता इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे बाहेरचावाडा मदिना मज्जिद समोर आबिद नाईक यांच्या घराजवळ इफ्तार पार्टी होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेस तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शहर अध्यक्ष ॲड राघवेंद्र…

Read More
You cannot copy content of this page