गुजराती नवरात्र मंडळ, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान व मेडिकल फाउंडेशनचा पुढाकार
देवगड ता.२७-:* देवगड तालुका गुजराती नवरात्र मंडळ व सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान देवगड आणि देवगड मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय प्रकाशभाई भद्रा आणि स्वर्गीय कांतिभाई पटेल यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच, मोफत नेत्र तपासणी, व हाडांच्या आजाराची मोफत तपासणी.पाठदुखी, कंबर दुखी, सांधेदुखी याची अस्थीरोग तज्ञ डॉ. चव्हाण यांच्या कडून तपासणी. सवलतीच्या दरात चष्मे तसेच xray व रक्त तपासणी अशा अनेक आजारांवरील तपासणी या शिबिरामध्ये उपलब्ध असणार आहे.हे शिबीर शुक्रवार दि. २९ एप्रिल रोजी सकाळी ९:०० ते १२:०० वा, देवगड मेडिकल फाउंडेशन डॉ. आठवले कॅम्पस येथे आयोजित केले आहे. शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा व अधिकाधिक दात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन गुजराती समाज तर्फे राजुभाई भद्रा, मनीष पटेल व भावेश पटेल यांच्याकडून करण्यात आले आहे.
अधिक माहिती करिता संपर्क:- डॉ. सुनील आठवले – 7382821000 मनीष पटेल – 94212702765 भावेश पटेल- 9422884363 यांचेशी संपर्क साधावा.
