न प सभेत बुवा तारी यांची मागणी
देवगड-प्रतिनिधी देवगड-जामसंडे नगरपंचायतीमधील प्रभाग क्रमांक १३ मधील खुल्या क्षेत्रात झालेल्या बेकायदेशीर बांधकामवरती योग्य ती कारवाई करा तसेच अन्य् प्रभागामधील देखील अश्या अन्य अनधिकृत बांधकामावरती कारवाई करा अशी मागणी देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या मासिक सभेमध्ये नगरसेवक निवृत्ती ऊर्फ बुवा तारी यांनी केली. देवगड-जामसंडे नगरपंचायतीची मासिक सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.
यावेळी उपनगराध्यक्षा मिताली सावंत,प्रभारी मुख्याधिकारी सुरज कांबळे, बांधकाम सभापती तेजस मामघाडी,आरोग्य सभापती नितिन बांदेकर,सभापती संतोष तारी आदी उपस्थित होते.
देवगड-जामसंडे नगरंपचायतीमधील सार्वजनिक शौचालयामध्ये दिवाबत्तीची सुविधा निर्माण करण्याची मागणी नगरसेविका प्रणाली माने यांनी केली. तर सार्वजनिक शौचालयाला कुलूप लावण्याचे अधिकारी आहेत का असा सवाल उपस्थित करीत सार्वजनिक शौचालयाचे कुलूप काढण्यात यावे अशी मागणी नगरसेवक संतोष तारी यांनी केली. तसेच देवगड-जामसंडे नगरपंचायतीहददीमध्ये लावण्यात आलेले दिशादर्शक फलक जिर्ण झालेले असून या दिशादर्शक फलकांची तात्काळ डागडुजी करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक रविंद्र चिंदरकर यांनी केली.
पावसाळया पुर्वी नगरपंचायतीच्या हददीमधील नाले सफाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका आद्या गुमास्ते यांनी केली. सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्तीसाठी २४लाख रुपयांचा निधी खर्च झाला तरी देखील शौचालयाची दुरावस्था कायमच आहे असा सवाल निवृतती तारी यांनी उपस्थित केला. सदर खर्च झालेल्या निधीबाबत चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच जामसंडे-मळई स्मशानभूमी चबुतरा बसविणे या कामास मुदतवाढ देण्यात यावी असा विचारविनिमय सभागृहामध्ये प्रश्न उपसिथत करण्यात आला असता या कामासाठी सातत्याने मुदतवाढ देवूनही काम होत नसेल तर अश्या ठेकेदाराला मुदतवाढ का देणेत यावी.
सदर काम १५ दिवसांमध्ये पुर्ण न केल्यास ठेकेदारावरती दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक निवृतती तारी यांनी केली. देवगड-जामसंडे शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून यासाठी देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे का उपाययोजना केली आहे असा सवाल नगरसेवक शरद टुकरुल यांनी केला आहे. देवगड-जामसंडे नगरपंचायतीमधील गेले काहि दिवस वारंवार विदयुत पुरवठा खंडित होत आहे. याकडे महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळाने गांर्भियाने लक्ष देवून विदयुत पुरवठा खंडित होता नये याची दक्षता घ्यावी अशी सुचना नगरसेवक बुवा तारी यांनी उपस्थित केली असता यावरती उत्तर देताना संबंधित खात्याने सांगितले कि, गेले काहि दिवस अचानक वादळी वा-यासह पाऊस पडल्यामुळे विदयुत तारा तुटणे व यंत्रणा नादरुस्त झाल्याच्या घटना झाल्यामुळे अधून मधून विदयुत पुरवठा खंडित होत होत.
यापुर्वी पावसाळया पुर्वीची कामे व खबरदारी घेतली जाईल असे त्यांनी सांगितले. देवगड-जामसंडे नगरपंचायतीमधील सध्या जी विकासाची कामे चालू आहेत ती केव्हा मंजुर झाली व आर्थिक तदतुद केव्हा करण्यात आली याची देखील माहिती देण्यात यावी अशी मागणी नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी केली असता. प्रशासनाने सांगितले की, आपणांस लेखी स्वरुपात माहिती दिली जाईल. देवगड पवनचक्की येथील अल्पावधीतच पर्यटकांना आकर्षित करणा-या गार्डनमध्ये प्रवेश करण्यासाठी पर्यटकांसाठी प्रत्येकी १० रु प्रवेश फि व १०वर्षाखालील मुलांना विनामुल्य प्रवेश दिला जाणार असल्याचा ठराव सर्वानुमते देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या मासिक सभेमध्ये घेण्यात आला.
