वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला शहरातील राजवाडा येथील श्रीदेव ब्राम्हण देवस्थानमध्ये मंगळवार दि. ३ मे रोजी अक्षयतृतीया निमीत्त प्रतिवर्षीप्रमाणे विविध धार्मिक, विविध स्पर्धात्मक मनोरंजनाचे खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले आहेत.
सकाळी धार्मिक विधी, १० वाजता श्री सत्यनाराण महापुजा, दुपारी १२ ते ३ यावेळेत महाप्रसाद, ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत विविध स्पर्धात्मक मनोरंजनाचे खेळ, सायंकाळी ७ वाजता मामा मोचेमाडकर यांचे दशावतारी नाटक होणार आहे. याचा लाभ भाविकांनी व रसिकांनी बहुसंख्येने घ्यावा असे आवाहन राजवाडा तरूण मंडळातर्फे केले आहे.
