रामगडावर 1 मे रोजी होणार दीपोत्सव मशाल उत्सव साजरा

कणकवली ता.२७-:* मालवण तालुक्यातील किल्ले रामगड येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी भव्य असा दीपोत्सव आणि मशाल उत्सव साजरा केला जाणार आहे. दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र आणि रामगड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे.

दुर्गवीर प्रतिष्ठाने 2015 मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर किल्ले रामगड येथील सुरू केलेल्या संवर्धन कार्यास सात वर्षे पूर्ण होत आहेत झाडी झुडपांमध्ये मुक्त असलेला आपला रामगड थोडाफार का असेना आज मोकळा श्वास घेत आहे हाच आनंद सोहळा महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने द्विगुणित करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र दिनी सकाळी 9.30 वाजता रामगड बाजारपेठ रामगड किल्ला पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर 10.30 वाजता गड पूजन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन, सकाळी 11 वाजता स्वागत आणि गड किल्ले छायाचित्र प्रदर्शन , दुपारी 1 वाजता शालेय विद्यार्थ्यांचे मनोगत आणि सायंकाळी 7 वाजल्यापासून दीपोत्सव आणि मशाल उत्सव आयोजित करण्यात आला आहे यात सहभाग घेण्याचे आवाहन रामगड ग्रामस्थांच्यावतीने दुर्गा प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे

You cannot copy content of this page